________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
कुत्रे, जनावर सर्व डिवोर्सवाले आहेत आणि हेच जर मनुष्य पण करू लागले तर मग दोघात फरक काय राहिला? माणूस बीस्ट (जनावर) सारखा झाला आहे. आपल्या हिंदुस्थानात तर एक लग्न केल्यानंतर दुसरे लग्न करत नव्हते. बायको मेली तरी पण दुसरे लग्न न करणारेही कित्येक होते. कसे पवित्र लोक जन्मले होते!
अरे, घटस्फोट घेणाऱ्यांना तर मी तासाभरात जुळवून देईल! ज्यांना घटस्फोट घ्यायचा असेल, त्यांना माझ्या जवळ घेऊन आलात तर मी एका तासात सर्व ठीक करून देईल. त्यानंतर ते दोघे एकत्रच राहतील. समज नसल्यामुळेच भीती वाटत असते. कित्येक वेगळे झालेल्या जोडप्यांना पुन्हा एकत्र आणले.
हे तर आपले संस्कार आहेत. दोघांना भांडता-भांडता ऐंशी वर्ष झाली, तरीही मेल्यानंतर तेराव्या दिवशी श्राद्ध करतात. श्राद्धात काकांना हे आवडत होते, ते आवडत होते, असे बोलून काकी सर्व काही मुंबईहून मागवून ठेवत होती. तेव्हा एक मुलगा, त्या ऐंशी वर्षाच्या काकींना म्हणाला, 'काकी, ह्या काकांनी तर सहा महिन्यांपूर्वी तुम्हाला पाडले होते. तेव्हा तर तुम्ही काकांबद्दल खूप उलट-सुलट बोलत होत्या.' त्यावर काकी म्हणाल्या तरी सुद्धा असा नवरा पुन्हा नाही मिळणार.' असे बोलली ती म्हातारी. संपूर्ण आयुष्याच्या अनुभवातून शोधून तिने काढले की ते मनाने खूप चांगले होते. प्रकृति जरा वाकडी होती, पण मनाने....
लोक पाहतच राहतील असे आर्दश आपले जीवन असायला हवे. आपण इंडियन आहोत. आपण काही अमेरिकन नाही. आपण आपल्या पत्नीला निभावून घ्यायचे आणि पत्नीने आपल्याला निभावून घ्यायचे, असे करता करता ऐंशी वर्ष होतात. आणि ती (फॉरेनवाली) एक तास सुद्धा निभावून घेणार नाही आणि तो सुद्धा एक तास निभावू शकणार
नाही.
प्रत्येकाच्या आपापल्या प्रकृतीचे फटाके फुटत असतात. हे फटाकडे आले कुठून?
प्रश्नकर्ता : आपापल्या प्रकृतीचे आहेत.