________________
पति- पत्नीचा दिव्य व्यवहार
कार्यकारी असतो. आणि सजोड (एकमेकांना अनुरूप जोडी) कार्यकारी नसतो. विजोड असेल तर उंच गतीत घेऊन जाईल. आणि सजोड तर भटकवतो एकत्र!
८४
विजोडमध्ये कसे असले पाहिजे की ते बिघडतील तेव्हा आपण शांत राहिले पाहिजे, जर स्वत: समजूतदार असू तर. परंतु तेही बिघडतील आणि आपणही बिघडलो तर राहिले काय ?
प्रश्नकर्ता : डिवोर्स, हे कोणत्या परिस्थितीत घेतले पाहिजे ? दादाश्री : जळो, हे डिवोर्स तर आता निघाले. पूर्वी डिवोर्स होतेच
कुठे ?
प्रश्नकर्ता : आता तर होत आहेत ना ? तर ते कुठल्या परिस्थितीत करावे ?
दादाश्री : कुठेही जुळत नसेल तर वेगळे झालेले बरे. एडजस्टेबल होणारच नसेल तर वेगळे झालेले बरे. नाहीतर आम्ही एकच गोष्ट सांगतो 'एडजस्ट ऐवरीव्हेर'. कारण की दुसऱ्यांना सांगून गुणाकार करायला जाऊ नका की, ' असा आहे नी तसा आहे. '
प्रश्नकर्ता : हे अमेरिकेतील लोकं डिवोर्स घेतात ते वाईट म्हणावे की, मग ज्यांचे एकमेकांसोबत जमत नाही म्हणून डिवोर्स घेतात ते चांगले म्हणावे ?
दादाश्री : डिवोर्स घेण्याचा अर्थच काय आहे! ते काही कप-बशी आहेत का? कप-बशीला वेगळे करत नाही, त्यांचे डिवोर्स करत नाही, तर ह्या माणसांचे, स्त्रियांचे डिवोर्स कसे करता येईल ?!
त्या अमेरिकन लोकांसाठी ठीक आहे, पण तुम्ही तर इंडियन आहात ना. जिथे एक पत्नीव्रत आणि एक पतीव्रतचे नियम होते. एका पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीला पाहू नका असे म्हणत, असे विचार होते, तिथे डिवोर्सचे विचार शोभा देतात ? डिवोर्स म्हणजे उष्टी भांडी बदलणे, जेवणानंतर उष्टे ताट दुसऱ्यांना देणे, नंतर तिसऱ्याला देणे, नुस्ती उष्टी भांडी बदलत राहणे, त्याचे नांव डिवोर्स, डिवोर्स तुला पसंत आहे ?