________________
पति - पत्नीचा दिव्य व्यवहार
दादाश्री : हो, हा जरा माझ्यावर आक्षेप आहे. सगळीकडेच असे होते. हा आक्षेप लोकांनी माझ्यावर लावला आहे. पण त्याच बरोबर मी पुरुषांनाही अशी समज देतो की जेणे करुन स्त्रिया नंतर पुरुषांना मान देतात. अशी तजवीज करतो. दिसण्यात मात्र असे दिसते की स्त्रियांचा पक्ष घेत आहोत पण आतून तर पुरुषांचा पक्ष घेत असतो. म्हणजे हे सर्व तजवीज कशी करावी ह्याचे मार्ग असले पाहिजे. दोघांना संतोष झाला पाहिजे.
७०
माझे तर स्त्रियांसोबतही जमत होते, आणि पुरुषांसोबतही तितकेच जमत होते. पण वास्तवात आम्ही तर स्त्रियांच्याही पक्षात नव्हतो आणि पुरुषांच्याही पक्षात नव्हतो. संसार-गाडा दोघांनी मिळून चालवा. स्त्रिया तर हेल्पिंग (सहायक) आहेत. त्या जर नसतील तर तुमचे घर कसे चालेल ? १९. पत्नीच्या तक्रारी
तू फिर्याद करशील तर तू फिर्यादी होशील. मी तर, जो फिर्याद करायला येतो त्यालाच गुन्हेगार मानतो. तुझ्यावर फिर्याद करण्याची वेळच का आली? फिर्यादी बहुतेक करुन गुन्हेगारच असतात. स्वतः गुन्हेगार आहात म्हणून तर फिर्याद करायला येता. तू फिर्याद करशील तर तू फिर्यादी ठरशील आणि समोरचा आरोपी बनेल. म्हणजे त्याच्या दृष्टीने तू आरोपी ठरशील म्हणून कोणाच्याही विरुद्ध फिर्याद करु नका.
एकजण जर भागाकार करत असेल तर दुसऱ्याने गुणाकार करावा म्हणजे रक्कम शून्य होईल. समोरच्यासाठी असा विचार करावा की त्याने मला असे म्हटले, तसे म्हटले, हाच गुन्हा आहे. भिंतीशी आपटल्यावर तिच्यावर का नाही ओरडत ? रस्त्याने चालताना जर झाडाला आपटलात तर त्याच्यावर का नाही ओरडत ? झाडाला जड कसे म्हणाल? जे इजा करतात ती सर्व हिरवी झाडेच आहेत ना ? असे ह्या सर्व लोकांचे आहे. 'ज्ञानी पुरुष' कसे सर्वांना माफ करतात ? त्यांना माहित आहे की हे समजत नाहीत बिचारे, झाडासारखे आहेत ना! समजूतदाराला तर बोलावेच लागत नाही ना, ते तर आत लगेचच प्रतिक्रमण करुन घेतात.
पतीने अपमान केला तर मग काय करता ? दावा मांडता ?