________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
प्रश्नकर्ता : असे कसे करणार? असे कोणी करत असेल?
दादाश्री : तर मग काय करता? माझा आशिर्वाद आहे, असे बोलून झोपी जा! काय ताई, तू झोपणार ना की मनात शिव्या देत राहणार? मनातल्या मनातच शिव्या देत राहते.
आणि तिने (बाजारात) तीन हजारांची साडी पाहिली असेल तर घरी येऊन तोंड फुगवून बसते. असे पाहिल्यावर आपण विचारले, 'काय झाले?' तर त्या साडीत हरवलेल्या असतात. जेव्हा आणून द्याल, तेव्हा (रुसवा) सोडतील, नाहीतर तोपर्यंत कटकट करणे सोडणार नाही. असे झाले नाही पाहिजे.
पत्नी म्हणेल की ह्या आपल्या सोफ्याची डिझाईन चांगली नाही. 'त्या तुमच्या मित्राकडे गेलो होतो, तिथे किती छान डिझाईन होती!' अरे, या सोफ्यात तुला सुख नाही मिळत? तेव्हा म्हणेल की, 'नाही, मी तिथे जे पाहिले त्यात सुख मिळेल.' मग पतीला तसाच सोफा आणावा लागतो! आता नवीन आणल्यावर जर कधी मुलाने ब्लेडने चीर मारली तर जणू आतून आत्मा कापला जातो! मुलं सोफ्याला चीर मारतील की नाही? आणि त्याच्यावर (सोफ्यावर) उड्या मारतील की नाही? आणि जेव्हा उड्या मारतील तेव्हा असे वाटते जणू काही छातीवर उड्या मारत आहेत असे वाटते! म्हणजे हा मोह आहे. हा मोहच तुम्हाला चावून चावून तुमचे तेल काढून टाकेल!
ह्यात तर विनाकारण जन्म बिघडून जाईल, आणि दुसरे म्हणजे ह्या बायकांना असे सांगू इच्छितो की, 'शॉपिंग करु नका.' शॉपिंग बंद करा. हे तर डॉलर आले म्हणून... अरे, जरुरत नाही तर का घेता. युझलेस. काही चांगल्या कामासाठी पैसे वापरले पाहिजे की नाही? कोणाच्या फॅमिलीत अडचण आली असेल, आणि त्या बिचाऱ्यांकडे (पैसे) नसतील, त्यांना जर पन्नास-शंभर डॉलर दिले तर किती बरे वाटेल! शॉपिंगमध्ये वायफळ खर्च करता आणि घरात ते सर्व सामान असेच पडून
राहते.
प्रश्नकर्ता : मग स्त्रिया त्रागा (मनमानी) करतात!