________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
स्त्री म्हणजे सहज प्रकृती, पतीला पाच करोडचे नुकसान झाले असेल, तर तो पूर्ण दिवसभर चिंता करत राहतो. दुकानात काही नुकसान झाले असेल तर घरी येऊन काही खात-पीत नाही, पण पत्नी तर तो घरी आल्यावर म्हणेल, उठा आणि चहा घ्या, आता जास्त हाय-हाय करु नका. तुम्ही चहा घ्या आणि खा निवांतपणे. अर्धी पार्टनरशिप असूनही तिला चिंता का होत नाही? कारण तिची प्रकृति साहजिक आहे. म्हणून या सहज प्रकृतिसोबत रहाल, तर जगता येईल नाहीतर जगता येणार नाही. आणि जर दोन पुरुष एकत्र राहत असतील तर मरुन जातील समोरासमोर. अर्थात स्त्री तर सहज आहे, म्हणून तर घरात आनंद राहतो थोडाफार.
स्त्री तर दैवी शक्ति आहे पण हे जर का पुरुषांना समजले तर काम फत्ते होऊन जाईल. स्त्रीचा दोष नाही, तर आपल्या चुकीच्या समजूतीचा दोष आहे, स्त्रिया तर देवी आहेत, त्यांना देवी पदावरुन खाली उतरवू नका. देवी आहे असे बोला. उत्तर प्रेदशात कित्येक ठिकाणी तर 'या देवी' असे बोलतात. आजही बोलतात, 'शारदा देवी आल्या, सीतादेवी आल्या!' अमुक काही प्रदेशात नाही का म्हणत?
आणि जर चार पुरुष एकत्र राहत असतील, तर एक जेवण बनवतो, एक दुसरा काही करतो... त्या घरात काही बरकत नसते. एक पुरुष आणि एक स्त्री राहत असतील, तर ते घर सुंदर दिसते. स्त्री (घराची) सजावट खूप चांगली करते.
प्रश्नकर्ता : तुम्ही फक्त स्त्रियांचाच पक्ष घेत जाऊ नका.
दादाश्री : स्त्रियांचा पक्ष घेत नाही. पुरुषांचाच पक्ष घेतो. स्त्रियांना तसे वाटते की आमचा पक्ष घेतात, पण तरफदारी पुरुषांचीच करतो. कारण फॅमिलीचे मालक तुम्ही आहात. शी इज नॉट ओनर ऑफ फॅमिली. यु आर
ओनर. लोकं मुंबईत म्हणतात ना, 'की तुम्ही पुरुषांचा पक्ष का घेत नाहीत फक्त स्त्रियांचाच पक्ष का घेता?' मी म्हणालो, 'त्यांच्या पोटी महावीर जन्माला आले आहेत, तुमच्या पोटी कोण जन्माला आले? विनाकारण वाद करत राहता?'
प्रश्नकर्ता : तरीही, तुम्ही स्त्रियांचा खूप पक्ष घेता, असे आम्हाला
वाटते.