________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
एक माणूस तीन हजारांची घोडी घेऊन आला होता. तसे तर रोज त्या घोडीवर बाप बसत असे. त्याचा मुलगा चोवीस वर्षाचा होता. एकदा मुलगा घोडीवर बसून तलावावर गेला. त्या घोडीची जरा छेडखानी केली! आता घोडी तीन हजारांची, तिची छेडखानी का करावी! तिची छेडखानी करु नये, तिला तिच्या चाली प्रमाणेच चालू द्यावे लागते. तर त्याने छेडखानी केल्यावर घोडी दोन पायावर एकदम उभी राहिली. घोडी उभी राहिल्यावर तो मुलगा खाली पडला! गाठोडा खाली पडला! तो घरी आल्यावर काय म्हणाला की, 'ह्या घोडीला विकून टाका. घोडी खराब आहे.' तुला बसता येत नाही आणि घोडीचे दोष काढतो?! बघा, हा मालक!! हे सर्व मालक!! मग मी म्हणालो, 'हो काय? ती घोडी खराब होती (तीन) हजारांची घोडी! मुर्खा, तुला बसता येत नाही, त्यात घोडीला कशाला बदनाम करतोस?' घोडीवर बसता तर आले पाहिजे की नाही? घोडीला बदनाम करतोस?
एकदा जर पतीने पत्नीचा प्रतिकार केला तर पतीचा काहीही प्रभाव राहत नाही. आपले घर चांगल्या रितीने चालत असेल, मुलं व्यवस्थित शिकत असतील, काहीच भानगड नसेल आणि तरीही तुम्ही विनाकारण चूका काढून तिचा विरोध केला तर ती तुमची अक्कल मापून घेणार की ह्या नवऱ्यात काही बरकत नाही.
तुम्हाला स्त्रियांबरोबर 'डीलिंग' (व्यवहार) करता येत नाही. तुम्हा व्यापाऱ्यांना जर ग्राहकांसोबत डीलिंग करता आले नाही तर ते तुमच्याकडे येणार नाहीत. म्हणून लोकं म्हणतात ना की 'सेल्समेन' चांगला ठेवा? चांगला, हुशार, देखणा सेल्समेन असेल तर लोकं जरा जास्त किंमत पण देऊन टाकतात. अशाप्रकारे तुम्हाला स्त्रियांबरोबर डीलिंग करता यायला हवी.
ह्या स्त्री जाती मुळेच तर सर्व जगाचे नूर आहे. नाहीतर घरांत बुवां पेक्षाही वाईट हाल झाले असते. स्त्री नसेल तर घरात सकाळी झाडू मारलेला नसेल! चहाचा काही ठिकाणा ही नसेल!! वाईफ आहे म्हणून तर ती तुम्हाला सांगते, तेव्हा मग तुम्ही सकाळी लवकर लवकर उठून आंघोळ करता, तिच्यामुळे तर सारी शोभा आहे. आणि आपल्यामुळे त्यांची शोभा आहे.