________________
पति - पत्नीचा दिव्य व्यवहार
आम्ही तर इतकेच जाणतो की, जर भांडणानंतर 'वाईफ' सोबत व्यवहारच ठेवायचा नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण पुन्हा बोलायचे असेल तर मग मधला सर्व व्यवहारच खोटा आहे. आमच्या हे ध्यानातच असते की, दोन तासानंतर पुन्हा बोलायचे आहे त्यानुळे आम्ही त्यात किटकिट करत नाही. तुमचा अभिप्राय पुन्हा बदलणार नसेल तर गोष्ट वेगळी आहे. तुमचा अभिप्राय बदलला नाही तर, तुम्ही केलेले खरे आहे. पुन्हा 'वाईफ' बरोबर रहायचे नसेल तर भांडण केले ते बरोबर आहे, परंतु हे तर उद्या पुन्हा एकत्र बसून जेवणार आहेत. मग काल जे नाटक केले त्याचे काय ? याचा विचार करावा लागेल ना ?
६०
सर्व प्रथम पतीने बायकोची माफी मागतली पाहिजे कारण पती मोठ्या मनाचे असतात. बायको आधी माफी मागत नाही.
प्रश्नकर्ता : पतींना मोठ्या, उदार मनाचे म्हटले म्हणून ते खुश झाले.
दादाश्री : नाही, हे तर मोठ्या मनाचेच असतात. त्यांचे मन विशाल असते आणि स्त्रिया साहजिक असतात, आणि साहजिक असतात म्हणून आतून उदय आल्या वर त्या माफी मागतील किंवा नाही पण मागणार. पण तुम्ही जर माफी मागितली तर त्या सुद्धा लगेच माफी मागतील. आणि तुम्ही पुरुष उदयकर्माच्या आधीन नाही राहत, तुम्ही तर जागृतीच्या आधीन राहता आणि ह्या उदय कर्माच्या आधीन राहणाऱ्या, म्हणून तर त्यांना सहज म्हणतात! स्त्रियांना सहज म्हणतात. तुमच्यात सहजता येत नाही. सहज झालात तर खूप सुखी व्हाल.
प्रश्नकर्ता : हा अहम् खोटा आहे, असे आपल्याला सांगितले जाते, आम्ही हे सर्व ऐकत असतो, संत महात्मा सुद्धा असे सांगतात, तरीही हा अहम् का जात नाही ?
दादाश्री : अहम् केव्हा जाईल ? तर तो अहम् खोटा आहे असे आपण जेव्हा स्विकारु तेव्हा जाईल. पत्नीसोबत भांडण होत असेल तर आपण समजून जावे की आपला अहम् खोटा आहे. म्हणजे आपण रोज त्याच अहम्ने आतून तिची खूप माफी मागत राहिल्यास, तो अहम् निघून जाईल. काही उपाय तर करावाच लागेल ना ?