________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
५९
पूर्वी जे भांडण केले होते त्याचे वैर बांधले गेले होते आणि ते आज भांडणाच्या रुपाने फेडले जात आहे. भांडण होते त्याच क्षणी वैरभावाचे बीज पडते. आणि ते पुढल्या जन्मी उगवते.
प्रश्नकर्ता : तर ते बीज कशाप्रकारे दूर होतील.
दादाश्री : हळू हळू समभावाने निकाल करत रहाल तर दूर होतील. खूप भारी बीज पडले असतील तर वेळ लागेल, शांती ठेवावी लागेल. प्रतिक्रमण खूप करावे लागतील. आपले कोणी काही घेत नाही, दोन टाईमचे जेवण मिळते. कपडे मिळतात, मग आणखी काय हवे? घराला कुलूप लावून जातात, पण आपल्याला दोन वेळचे जेवण मिळते, की नाही मिळत तेवढेच पहायचे आहे. आपल्याला आत बंद करुन गेले तरी हरकत नाही. आपण झोपून जावे. पूर्व जन्माचे वैर असे बांधले गेले आहेत की, आपल्याला कुलूप लावून आत कोंडून जातात! वैर, आणि तेही असमंजसपणे बांधले गेलेले! समंजसपणे असेल तर आपण समजू की हे समंजसपणे आहे, तर त्याचे निवारण होईल. पण आता असमंजसपणे असेल तर निवारण कसे होईल? अर्थात तिथे ती गोष्ट सोडून द्यावी.
आता सर्व वैरभाव सोडून द्यायचे. म्हणून कधीतरी आमच्याकडून 'स्वरूप ज्ञान' प्राप्त करून द्या म्हणजे सर्व वैर सुटून जातील. ह्या जन्मातच सर्व वैर सोडून द्या. आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू.
ढेकूण चावतात, ते तर बिचारे खूप चांगले आहेत. पण पति-पत्नीला चावायला धावतो आणि पत्नी पतीला चावायला धावते, ते तर खूप असह्य आहे. काय? चावता की नाही चावत ?
प्रश्नकर्ता : चावतो.
दादाश्री : हे चावा घालणे बंद करायचे आहे. ढेकूण चावतात, पण ते चावून निघून जातात. ते बिचारे आतून तृप्त झाल्यावर निघून जातात. पण बायको तर सतत चावतच राहते. एक जण तर मला म्हणाला, माझी वाईफ तर मला सर्पिणी सारखी चावते! तर मुर्खा मग लग्न का केले त्या सर्पिणी बरोबर? मग काय तो स्वतः साप नसेल? मुर्खा ?! अशीच का सर्पिण मिळेल? साप असेल तरच सर्पिण येईल ना?