________________
५८
पति- पत्नीचा दिव्य व्यवहार
प्रश्नकर्ता : तर मग काही बोलायचेच नाही ?
दादाश्री : बोलायचे, जर बोलता येत असेल तर सम्यक् बोला, नाहीतर कुत्र्यासारखे भुंकत राहण्यात काय अर्थ आहे ? म्हणून सम्यक् बोलावे.
प्रश्नकर्ता : सम्यक् म्हणजे कसे ?
दादाश्री : अहोहो ! तुम्ही या मुलाला का पाडले? त्याचे कारण काय? तेव्हा ती सांगेल की, मी जाणून-बुझून पाडले का ? तो तर माझ्या हातातून निसटला आणि पडला.
प्रश्नकर्ता : हे तर ती खोटे बोलते ना ?
दादाश्री : ती खोटे बोलते हे आपल्याला पहायचे नाही. खोटे बोलेल की खरे बोलेल ते तिच्या आधीन आहे. ते आपल्या आधीन नाही.
प्रश्नकर्ता : बोलता येत नसेल तर मग काय करावे, गप्प बसावे ?
दादाश्री : मौन रहा आणि पाहत रहा की 'क्या होता है?' सिनेमात मुलाला फेकतात तेव्हा तुम्ही काय करता ? बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण क्लेश वाढणार नाही अशाप्रकारे बोलण्याचा अधिकार आहे. ज्या बोलण्याने क्लेश वाढेल ते तर मूर्खाचे काम आहे.
प्रश्नकर्ता : आपल्याला भांडण करायचे नसेल, किंवा आपण कधी भांडतच नसू तरी सुद्धा घरातील सर्व समोरून रोजच भांडण करु लागले तर त्यावेळी काय करावे ?
दादाश्री : आपल्याला भांडणप्रूफ व्हायला पाहिजे. भांडणप्रूफ झालात तरच या संसारात राहता येईल. आम्ही तुम्हाला भांडणप्रूफ बनवू. भांडण करणाराही कंटाळून जाईल असे आपले स्वरूप असायला हवे. 'वर्ल्ड' मध्ये कोणीही आपल्याला डिप्रेस करु शकणार नाही, असे व्हायला पाहिजे. आपण भांडण प्रूफ झाल्यावर काही भानगडच उरली नाही ना ? लोकांना भांडण करायचे असेल, शिव्या द्यायच्या असतील तरी आपली काही हरकत नाही, आणि तरीही आपण निर्लज्ज नाही समजले जाणार, उलट आपली जागृति वाढेल.