________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
५७
वागते?' बायकोलाही असे वाटते की 'नवऱ्यासोबत माझे वर्तन असे का होते आहे ?' तिला पण दुःख होते, पण काय करणार? मग मी त्यांना विचारले की 'बायकोने तुम्हाला शोधून आणले होते की तुम्ही बायकोला शोधून आणले?' तेव्हा तो म्हणतो की, 'मी शोधून आणले.' तर मग तिचा बिचारीचा काय दोष? आणल्यानंतर वाईट निघाली, त्यात ती काय करणार, कुठे जाईल मग?
प्रश्नकर्ता : अबोला घेऊन, गोष्ट टाळल्याने त्याचा निकाल होऊ शकतो?
दादाश्री : नाही होऊ शकत? आपल्याला जर ते समोर भेटले तर, आपण त्यांची विचारपूस करायची, तुम्ही कसे आहात? कसे नाही?' असे विचारायचे. समोरचा जर बोंबाबोम करत असेल तर आपण जरा शांत राहून समभावे निकाल करावा, कधी ना कधी त्याचा निकाल करावाच लागेल ना? अबोला धरला म्हणून काय त्याचा निकाल लागला? हा निकाल लागला नाही म्हणून तर अबोला धरुन ठेवला. अबोला म्हणजे ओझे. ज्याचा निवाडा झालेला नाही त्याचे ओझे. आपण तर लगेचच त्याला थांबवून म्हणावे, 'थांबा ना! माझी काही चुक असेल तर मला सांगा. माझ्याकडून खूप चूका होतात. तुम्ही तर खूप हुशार-शिकलेले, म्हणून तुमच्याकडून चुक होणार नाही, पण मी तर कमी शिकलेलो आहे म्हणून माझ्याकडून खूप चूका होतात.' असे बोलाल तर ती खुश होऊन जाईल.
प्रश्नकर्ता : असे बोलल्यानंतरही नरम पडली नाही तर काय करावे?
दादाश्री : नरम पडली नाही तर काय करावे? आपण सांगून मोकळे व्हायचे आणखी काय उपाय? कधी ना कधी एखाद्या दिवशी नरम पडेल. दमदाटीने नरम कराल तर त्याने काही नरम होणार नाही. आज नरम वाटेल, पण ती मनात नोंद ठेवेल आणि जेव्हा तुम्ही नरम व्हाल त्या दिवशी सर्व उकरुन काढेल. अर्थात् जगत वैरभाववाले आहेत. निसर्गाचा नियम असा आहे की, प्रत्येक जीव आतमध्ये वैर बांधतोच. आत वैरभावाचे परमाणु साठवून ठेवतात. म्हणून आपण त्या प्रकरणाचा पूर्णपणे निकाल लावावा.