________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
आम्ही तर हा साधा सरळ रस्ता दाखवून देतो. आणि हे भांडणतंटे काही रोज-रोज होतात? जेव्हा आपल्या कर्माचा उदय असेल, तेव्हा होतात, तेवढ्यापुरते 'ऐडजस्ट' होउन जायचे. घरात वाईफसोबत भांडण झाले असेल, तर भांडण झाल्यानंतर वाईफला हॉटेलात नेऊन खाऊ-पिऊ घालून खुश करायचे. आता कुठलाही तंत नाही राहिला पाहिजे.
म्हणून हे ज्ञान असेल तर ही भानगडच उरणार नाही. ज्ञान असेल, तर आपण सकाळच्या पहरी (शुद्धात्माचे) दर्शनच करणार ना? वाईफच्या
आतही भगवंताचे दर्शनच करावेच लागणार ना? वाईफच्या आतही 'दादा' दिसले तर कल्याण झाले. वाईफला पाहिल्यावर दादा दिसतील ना! तिच्यात शुद्धात्मा दिसतो ना! तर मग कल्याण झाले.
अर्थात जसे-तसे करुन, 'ऐड्जस्ट' करुन टाईम पसार काढावा, म्हणजे उधारी फेडली जाईल. कोणाचे पंचवीस वर्षाचे, कोणाचे पंधरा वर्षाचे, तर कोणाचे तीस वर्षाचे, इच्छा असो अथवा नसो तरीही देणे तर फेडावेच लागते. आवडत नसेल तरीही त्याच खोलीत एकत्र रहावे लागते. एकीकडे बिछाना, 'बाईसाहेबांचे' आणि दुसरीकडे 'भाऊसाहेबांचे'! तोंड फिरवून झोपले तरीही बाईसाहेबांना विचार तर भाऊसाहेबांचेच येतात ना! सुटकाच नाही! हा संसारच असा आहे. फक्त तुम्हालाच ते आवडत नाहीत असे नाही, तर त्यानांही तुम्ही आवडत नसता! अर्थात् ह्यात मजा घेण्यासारखी नाही.
'डोन्ट सी लॉज, प्लीज सेटल' (कायदा बघू नका, समाधान करा). समोरच्याला सेटलमेन्ट (समाधान)करायला सांगावे. 'तुम्ही असे करा, तसे करा.' असे बोलायला वेळच कुठे असतो? समोरच्याच्या शंभर चूका असतील तरी पण तुम्हाला तर आपलीच चुक आहे असे समजून पुढे चालत रहायचे. ह्या काळात 'लॉ' (कायदे) बघायचे असतात का? हे तर आता शेवटच्या पायरी वर पोहचले आहे!
प्रश्नकर्ता : कित्येकवेळा घरात जोरदार भांडण होऊन जाते, तेव्हा काय करावे?
दादाश्री : शहाणा माणूस असेल, तर लाखो रुपये दिले तरी भांडण