________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
प्रश्नकर्ता : ही आसक्ति का सुटत नाही?
दादाश्री : ती तर नाही सुटणार, कारण 'माझी-माझी' म्हणत, बांधले ना! आता 'नाही माझी, नाही माझी' असे जप केल्यावर, सुटतील. हे तर जितके आटे फिरवले असतील, तितके आटे सोडवावे तर लागतीलच ना ! अर्थात् ही तर फक्त आसक्तिच आहे. चेतन सारखी वस्तूच नाही. हे सर्व तर चावी भरलेले पुतळे आहेत.
आणि जिथे आसक्ति आहे तिथे आक्षेप आल्याशिवाय रहातच नाही. हा आसक्तिचा स्वभाव आहे. आसक्ति आहे म्हणून आक्षेप करणारच की, 'तुम्ही असे आहात नी, तुम्ही तसे आहात ! तुम्ही असे नी तु अशी' असे नाही का बोलत? तुमच्या गावी असे बोलतात की नाही बोलत? असे बोलतात ते आसक्तिमुळे.
ह्या मुली नवरा पसंत करतात, नीट पारखून-निरखून पसंत करतात मग त्यानंतरही भांडत नसतील? भांडतात खरे? तर मग ह्याला प्रेम म्हणतच नाही ना ! प्रेम तर कायमचे असते. जेव्हा बघाल तेव्हा तसेच प्रेम, तसेच दिसेल, त्यास प्रेम म्हणतात आणि तिथे आश्वासन घेऊ शकता. हे तर तुम्हाला प्रेम राहत असेल, आणि ती रुसून बसली असेल तर, तेव्हा म्हणाल, जळो हे कसले तुझे प्रेम! त्यास फेक इथून गटारीत! तोंड फुगवून फिरत असेल तर अश्या प्रेमाचे काय करायचे? तुम्हाला काय वाटते?
जिथे खूप प्रेम असते, तिथेच नावड होते, हा मनुष्य स्वभाव आहे.
ही लोक तर सिनेमा पहायला जाताना पूर्णतः आसक्तिच्या धुंदीतच असतात पण परत येताना 'तु बिन अक्कलेची आहे' असे बोलतात. तेव्हा ती सुद्धा म्हणते, 'तुमच्यात तरी कुठे लायकी आहे ?!' अशी बडबड करत करत घरी येतात. तो अक्कल शोधतो, तर ही लायकी बधते !
प्रेमाने सुधरतात, हे सर्व सुधरवायचे असेल, तर प्रेमानेच सुधरेल. ह्या सर्वांना मी सुधारतो ना, ते प्रेमाने सुधारतो. आम्ही प्रेमानेच बोलतो त्यामुळे गोष्ट बिगडत नाही. आणि जरापण द्वेषाने बोलाल तर ती गोष्ट बिगडून जाईल. दुधात दही घातले नसेल आणि अशीच जरा हवा लागली, तरी पण त्या दुधाचे दही बनून जाते.