________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
५१
ही तर सर्व राँग बिलीफ (अज्ञान मान्यता) आहे. 'मी चंदुभाई आहे' ही राँग बिलीफ आहे. मग घरी गेल्यावर आपण विचाराले की हे कोण आहेत? तेव्हा ते बोलतात, मला नाही ओळखले? या बाईचा मी मालक (नवरा-धनी) आहे. ओहोहोहो ! आला मोठा मालक ! जणू ह्या मालकाचा कोणी मालकच नसेल, असे बोलतो? मालकाचा कोणी मालक असेल की नाही ? तर मग वरच्या मालकाची पत्नी तुम्ही झालात आणि तुमची पत्नी ही झाली. ह्या गोंधळात कशाला पडायचे? मालक व्हायचेच कशाला? आमचे 'कम्पेनियन' (सहचारी) आहेत, असे म्हणायला काय हरकत आहे?
प्रश्नकर्ता : दादांनी खूप 'मॉर्डन' भाषा वापरली.
दादाश्री : तर काय मग? त्यामुळे टसल (संघर्ष) कमी होणार ना ! हो, एका रुममध्ये दोन 'कम्पेनियन' राहत असतील, तर एक जण चहा बनवणार आणि दुसरा पिणार आणि दुसरा त्याबदल्यात त्याचे काम करुन देईल. असे करुन 'कम्पेनियन' चालत असते.
प्रश्नकर्ता : 'कम्पेनियन'मध्ये आसक्ति (मोह) असते की नाही ?
दादाश्री : ह्यात आसक्ति आहे पण ही आसक्ति अग्नी सारखी नसते. हे तर शब्दच अतिशय आसक्तिवाले आहेत. मालक आणि मालकीण ह्या शब्दातच इतकी गाढ आसक्ति भरली आहे ना की, 'कम्पेनियन' म्हणाल तर जरा आसक्ति कमी होईल.
एका गृहास्थांची बायको २० वर्षांपूर्वी वारली होती. तर एकजण मला म्हणाला की, 'ह्या काकांना मी रडवू का?' मी विचारले, 'कसे रडवशील?' ह्या वयात तर ते नाही रडायचे. तेव्हा तो म्हणाला, 'पहा, ते किती सेन्सिटिव (भावूक) आहेत?' मग तो काकांना म्हणाला, 'काय काका, काकींच्या बाबतीत तर विचारुच नका! काय त्यांचा स्वभाव होता!' तो असे बोलतच होता की, काकांना खरोखरच रडू येऊ लागले! अरे, कसे घनचक्कर! साठाव्या वर्षी सुद्धा बायकोसाठी रडू येते! हे तर कसले घनचक्कर आहेत? हे लोक तर सिनेमात पण रडतात ना? त्यात कोणी मेले असेल तर पाहणाऱ्यांना पण रडू येते!