________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
४९
दादाश्री : परिणाम कसाही येवो, आपल्याला तर 'समोरच्याचे समाधान करायचे आहे.' इतके नक्की करा. 'समभावे निकाल' करण्याचे नक्की करा, मग निकाल हो अगर न हो ते आधीच पहायचे नाही, आणि निकाल तर होईल. आज नाही तर उद्या होईल, परवा होईल, जास्त चिकट असेल तर दोन वर्ष, तीन वर्ष किंवा पाच वर्षानेहि होईल. 'वाईफ' सोबतचे ऋणानुबंध खूपच चिकट असतात, मुलांचे पण चिकट असतात, आईवडिलांचेही चिकट असतात, तिथे जरा जास्त वेळ लागेल. हे सर्व नेहमी तुमच्या बरोबरच राहत असतात तिथे निकाल हळू-हळू होईल. पण तुम्ही नक्की केले आहे की, कसेही करुन आपल्याला 'समभावे निकाल करायचा आहे' तर मग एक ना एक दिवस निकाल होऊनच राहिल, त्याचा अंत
येईल.
१४. 'माझी' चे आटे उलगडतील असे लग्नाच्या वेळी मंडपात बसता ना? मंडपात बसता तेव्हा असे पाहता, हं, ही माझी वाईफ, म्हणजे पहिला आटा बसला. माझी वाईफ, माझी वाईफ, माझी वाईफ..... लग्नासाठी बसल्यापासूनच आटे फिरवायचे सुरु करतो, ते आजपर्यंत आटे फिरवतच आहोत तर आतापर्यंत किती आटे बसले असतील ! आता ते कश्याप्रकारे उलगडतील. ममतेचे आटे लागले !
आता, 'नाही माझी, नाही माझी' असे सतत अजपाजप करा! 'ही स्त्री माझी नाही, नाही माझी' बोला म्हणजे आटे उलटे फिरतील. पन्नास हजारवेळा माझी-माझी म्हणून जे आटे फिरवले आहेत, ते 'नाही माझी' चे पन्नास हजार आटे उलटे फिरवा तेव्हा उलगडतील ! एका माणसाच्या पत्नीच्या मरणाला दहा वर्ष झाली होती, तरीही तो तिला विसरु शकत नव्हता आणि सतत रडत रहायचा. हे कसले भूत आहे? मी त्याला 'नाही माझी, नाही माझी' बोलण्यास सांगितले. तेव्हा त्याने काय केले? तीन दिवस 'नाही माझी, नाही माझी' बोलतच राहिला, सतत बोलतच राहिला. तेव्हा मग त्याचे रडायचे थांबले! हे सर्व तर आटेच फिरवले गेले आहेत आणि त्यामुळेच ही फजिती झाली आहे. म्हणजे हे सर्व कल्पित आहे. मला काय सांगायचे आहे ते तुम्हाला समजले? आता असा सरळ रस्ता कोण दाखवणार?