________________
पति - पत्नीचा दिव्य व्यवहार
'कढी खारट झाली' असे आपण नाही बोललो तर नाही का चालणार ? ओपिनियन नाही दिले तर काय त्या लोकांना नाही माहित पडणार? की मग आपल्यालाच बोलायला हवे. मग तर आपल्याकडे पाहुणे आलेले असतील, तर त्या पाहुण्यांना पण खाऊ देणार नाही. तर मग आपण असे का बोलावे? ती खाणार तेव्हा तिला कळणार नाही का ? की आपल्यालाच तिला सांगावे लागेल ?
प्रश्नकर्ता: कढी खारट असली तर 'खारट' बोलावेच लागेल ना ?
दादाश्री : मग जीवन खारटच होऊन जाईल ना! तुम्ही खारट बोलून समोरच्याचा अपमान करता. त्याला फॅमिलि बोलत नाही!
२६
प्रश्नकर्ता : आपले असतील त्यांनाच सांगतो ना, परक्यांना थोडीच सांगू शकतो ?
दादाश्री : तर आपल्यानांच काय दुखवायचे ?
प्रश्नकर्ता : सांगितले तर दुसऱ्यावेळेस नीट बनवतील ना, त्यासाठी.
दादाश्री : ती नीट बनवणार की नाही बनवणार, ह्या सर्व गोष्टी गप्पा आहेत. कशाच्या आधारावर होत असते ? ते मला माहित आहे. बनवणाऱ्यांच्या हातातही सत्ता नाही आणि तुम्ही सांगणाऱ्यांच्या हातातही सत्ता नाही. हे सर्व कोणत्या सत्तेच्या आधारावर चालत आहे ? म्हणून अक्षरही बोलण्यासारखे नाही.
थोडा तरी शहाणा झालास की नाही तु ? होशील ना शहाणा ? पूर्णपणे शहाणे व्हायचे. घरी वाइफ बोलेल. 'अरे, असा नवरा पुन्हा पुन्हा मिळो. ' मला आजपर्यंत एकाच स्त्रीने सांगितले. 'दादाजी, नवरा हवा तर असाच हवा.' नाहीतर जास्तकरुन तोंडावर चांगले बोलतात, परंतु पाठून किती तरी शिव्या देतात माझ्या मनात आजही नोंद आहे. असे बोलणारी एक तरी बाई मिळाली!
बाकी स्त्रियांना सारखे टोकले नाही पाहिजे. भाजी थंड का झाली ? डाळीला फोडणी बरोबर का नाही दिली ? अशी कट कट का करता? बारा महिन्यात एखाद्या दिवशी एखादा शब्द बोललात तर ठिक आहे. परंतु हे तर रोजचेच ? 'नवरा मर्यादेत तर बायको लाजेत. '