________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
२५
काहीच हरकत नाही, मतभेद करण्यापेक्षा पलटणे चांगले. लगेचच पलटून गेलो पूर्ण...... मी सांगितले, 'मी असे नाही सांगू इच्छित' मी खोटे बोललो, मी सांगितले 'मी वेगळे बोलतो आहे आपल्या समजण्यात जरा फरक झाला आहे. मी असे नाही सांगत होतो.' तेव्हा म्हणाल्या, तर काय सांगत होतात ? तेव्हा मी म्हणालो, 'हे चांदीचे छोटे भांडे द्या आणि त्यासोबत पाचशे रुपये नगद द्या.' ते त्यांच्या उपयोगी येतील. त्यावर हीराबा मह्णाल्या 'तुम्ही तर भोळे आहात. इतके सारे देतो कोणी?' ह्यावर मी समजलो की, जिंकलो आपण! मग मी सांगितले 'तुम्हाला जितके द्यायचे असेल तितके द्या. चारीही भाच्या आपल्याच मुली आहेत!' तेव्हा त्या खुश झाल्या मग 'तुम्ही तर देवासारखे आहात' असे बोलू लागल्या!
बघा, पट्टी बांधली ना! मला माहित होते की, मी पाचशे बोललो तर त्या तेवढे देतील अश्या नाहीत त्या! तर आपण त्यांनाच अधिकार देऊन टाका न! मी स्वभाव ओळखत होतो. मी पाचशे दिले तर त्या तीनशे देऊन येतील. तर मग बोला, सत्ता सोपवायला हरकत आहे का मला?
४. जेवताना किट-किट घरात कटकट कश्यासाठी करता? का? माणसांकडून चुक नाही होऊ शकत?
जो करतो त्याची चुक की जो करत नाही त्याची चुक? प्रश्नकर्ता : करतो त्याची.
दादाश्री : तर मग कढी खारट' आहे अशी चुक काढायला नको. त्या कढीला बाजूला सारून, बाकी जे काही आहे ते जेवून घेतले पाहिजे. कारण त्यांना सवय आहे की अशी काही चुक काढून पत्नीला धमकावायचे. ही सवय आहे त्यांची. पण ह्या ताई पण काही कच्च्या नाहीत. अमेरिका असे करतो तर, रशिया तसे करतो. अर्थात् हे तर अमेरिका आणि रशियासारखे झाले आहे, कुटुंबात, फमिलित, म्हणजे मग आतमध्ये कॉल्डवॉर (शीतयुद्ध) निरंतर चालतच रहातो. असे नाही, फॅमिलि बनवून टाका. फॅमिलित कसे वागावे ते मी तुम्हाला समजावेल. इथे तर घरोघरी क्लेश आहे.