________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
प्रश्नकर्ता : ती तर त्यांचीच चुक झाली असेल, पण तुम्ही बोलत आहात की माझी चुक झाली होती.
२४
दादाश्री : हो, पण त्यांची चुक नव्हती. माझीच चुक. मलाच मतभेद होऊ द्यायचे नाही. त्यांना तर मतभेद झाले तरी काही हरकत नाही आणि नाही झाले तरी काही हरकत नाही. मलाच होऊ द्यायचे नाही, म्हणून माझीच चुक झाली ना ! हे असे केले तर खुर्चीला लागेल की मला ?
प्रश्नकर्ता : आपल्याला.
दादाश्री : तर मग मलाच समजले पाहिजे ना ?
एके दिवशी मतभेद झाले. मी फसलो. मला हीराबा म्हणाल्या माझ्या भावाच्या चार मुलींचे लग्न व्हायचे आहे. त्यात ह्या पहिल्या मुलीचे लग्न आहे, तर आपण लग्नात काय (आहेर ) देणार. तसे तर त्यांनी असे नाही विचारले असते तरी चालले असते. जे काही देणार त्याला मी नाही म्हणणार नण्हतो. मला विचारले म्हणून मी माझ्या अक्कलेप्रमाणे चाललो. त्यांच्या सारखी अक्कल माझ्यात कुठून असणार ? त्यांनी विचारले म्हणून मी सांगितले की, नवीन काही बनवण्यापेक्षा ह्या कपाटात चांदीचे जे काही आहे त्यातले काहीतरी द्या ना!
ह्यावर त्यांनी मला काय सांगितले माहिती आहे का ? आमच्या घरी माझे-तुझे सारखे शब्द निघत नव्हते. आपण, आपलेच असेच बोलले जात होते. आता त्या अश्या बोलल्या की, 'तुमच्या मामाच्या मुलाच्या मुलीचे लग्न होते, तेव्हा तर मोठे-मोठे चांदीचे ताट देता ना?' त्यादिवशी माझे- तुमचे बोलल्या, नेहमी आपलेच म्हणत असत. माझे - तुमचे असा भेद करुन बोलत नव्हत्या. मी विचार केला, आज आपण फसलो, मी लगेचच समजून गेलो. म्हणून ह्यातून बाहेर निघण्याचा रस्ता शोधू लागलो. आता कश्याप्रकारे हे सुधारायचे, रक्त निघू लागले, आता कश्याप्रकारे पट्टी बांधावी की, रक्त बंद होईल, ते आम्हाला माहित होते.
अर्थात् त्या दिवशी माझे-तुझे झाले. 'तुमच्या मामाचा मुलगा' म्हटले! इथपर्यंत पहोचले. माझी समज किती उल्टी ! मी विचार केला हे तर ठोकर लागण्यासारखे झाले, आज तर ! तेव्हा मी लगेचच पलटलो. पलटण्यात