________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
क्लेशमय जीवन नाही असले पाहिजे ना? सोबत काय घेऊन जाणार आहे. घरात एकत्र खायचे प्यायचे आणि कटकट का म्हणून करावी? जर इतर कोणी नवऱ्याबद्दल काही बोलले तर बायकोला राग येतो की माझ्या नवऱ्याला असे बोलतात आणि स्वत: नवऱ्याला बोलत असते की तुम्ही असे आहात नी तुम्ही तसे आहात. असे असायला नको. नवऱ्याने ही असे नाही केले पाहिजे. तुमच्यात क्लेश असेल, तर मुलांच्या जीवनावर परिणाम होईल. चिमुकली मुले, त्यांच्यावर दुष्परिणाम होतो म्हणून क्लेश नसावा. क्लेश जाईल तेव्हा मग घरातली मुले पण चांगली होतील. ही तर मुले सर्व बिगडून गेली आहेत!
आम्हाला तर ज्ञान प्राप्त झाले तेव्हापासून, वीस वर्षांपासून तर क्लेश होतच नाही पण त्याआधी वीस वर्षापूर्वीही क्लेश नव्हता. पहिल्यापासून आम्ही क्लेशला तर काढूनच टाकले होते, कुठल्याही परिस्थितीत क्लेश करण्यासारखे हे जगत नाही.
आता तुम्ही विचारपूर्वक कार्य करा ना! किंवा दादा भगवानांचे नांव घ्या. मी सुद्धा दादांचे नांव घेऊन सर्व कार्य करत असतो. दादा भगवानांचे नांव घ्याल तर लगेच तुमच्या मनाप्रमाणे होऊन जाईल.
३. पति-पत्नीत मतभेद आपल्याला तर मुख्यतः क्रोध-मान-माया-लोभ जातील, कमी होतील असे पाहिजे. आपल्याला इथे पूर्णता प्राप्त करायची आहे, प्रकाश करायचा आहे. इथे अंधारात कुठपर्यंत रहायचे? तुम्ही क्रोध-मान-मायालोभची निर्बलता, मतभेद पाहिली आहे का?
प्रश्नकर्ता : खूपच. दादाश्री : कुठे? कोर्टात? प्रश्नकर्ता : घरात, कोर्टात, सर्व ठिकाणी.
दादाश्री : घरात तर काय असेल? घरात तर तुम्ही तिघेजण, तिथे मतभेद कसले? दोन-चार, किवां पांच, मुली आहेत असे तर काही नाही. तुम्ही तिघेजण त्यात कुठले आले मतभेद?