________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
भिंतीवर जाऊन आदळेल. असा रुबाब मारते नि तसा रुबाब मारते पण आपल्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही तर तिची पावर भिंतीवर आदळून परत तिलाच लागेल.
प्रश्नकर्ता : आपल्या बोलण्याचा अर्थ असा आहे की आम्ही बायकांचे ऐकायचे नाही.
दादाश्री : ऐका, सर्व चांगल्याप्रकारे ऐका, आपल्या हिताची गोष्ट असेल तर सर्व काही ऐका आणि पावर जर आपटत असेल, तर त्यावेळी मौन रहाचये. ते आपण पाहून घ्यायचे की किती प्यालेली (भडकलेली) आहे. पिल्या प्रमाणे पावर वापरेल ना?
प्रश्नकर्ता : बरोबर आहे. त्याच प्रमाणे पुरुष पण खोटी पावर दाखवत असेल तर?
दादाश्री : तेव्हा आपण समजून जायचे. हं.... आज जरा बिनसलेले आहे पण हे मनात बोलावे. तोंडावर काही बोलू नये.
प्रश्नकर्ता : हं.... नाहीतर आणखीन बिनसतील.
दादाश्री : म्हणे, आज बिनसले आहे, असे नाही व्हायला पाहिजे. किती सुंदर... दोन मित्र असतील, तर ते आपापसात असे वागतील का? मग त्यांची मैत्री कशी टिकणार? असे केल्याने त्यांची मैत्री टिकणार का? स्त्री-पुरुष म्हणजे मैत्रीपूर्ण घर चालवायचे आहे आणि काय ही हालत करुन टाकली आहे. काय ह्यासाठीच लोक आपल्या मुलींचे लग्न ग्रीनकार्डवाल्यांबरोबर करत असतील का? तर मग हे शोभते का आपल्याला? तुम्हाला कसे वाटते? नाही ना शोभत आपल्याला! संस्कारी कोणाला म्हणावे? ज्यांच्या घरात क्लेश असेल त्यांना संस्कारी म्हणावे की क्लेश नाही होत त्यांना?
एक तर घरात कधी क्लेश नाही झाला पाहिजे आणि होत असेल तर वळवून घेतला पाहिजे. जर क्लेश होईल असे असेल, आपल्याला वाटले की आता पेटणार आहे त्या आधीच पाणी टाकून थंड करून टाकावे. पूर्वीसारखे क्लेशमय जीवन जगण्यात काय फायदा. याचा अर्थच काय?