________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
प्रश्नकर्ता : नाही, पण तिघातच भरपूर मतभेद आहेत. दादाश्री : ह्या तिघातपण?! असे!
प्रश्नकर्ता : जीवनात जर कॉन्फलिक्ट (मतभेद) नसतील, तर जीवनाची मजाच येणार नाही!
दादाश्री : ओहोहो.... असे होय. त्यामुळे मजा येते का? तर मग रोजच असे करा ना! हे कोणी शोधून काढले? कुठल्या बुद्धिवंताचा शोध आहे हा? कॉन्फलिक्टची मजा घ्यायची असेल तर मग रोजच मतभेद केले पाहिजे!
प्रश्नकर्ता : हे तर नाही आवडणार.
दादाश्री : हे तर लोकांनी स्वत:चे रक्षण केले आहे ! मतभेद स्वस्त पडेल की महाग? थोड्या प्रमाणात होतात की जास्त प्रमाणात?
प्रश्नकर्ता : थोड्या प्रमाणात पण होतात आणि जास्त प्रमाणातही होतात.
दादाश्री : कधी दिवाळी आणि कधी होळी, ह्यात मजा येते की मजा निघून जाते?
प्रश्नकर्ता : हे तर संसार चक्र असे आहे.
दादाश्री : नाही, या लोकांना बहाणे बनविण्यासाठी छान भेटले आहे. संसार चक्र असे आहे असला बहाणा बनवतात पण हे बोलत नाही की माझी निर्बलता आहे.
प्रश्नकर्ता : निर्बलता तर आहेच. निर्बलता आहे म्हणून तर त्रास होत आहे ना!
दादाश्री : हो बस, म्हणून लोक संसाराचे चक्र सांगून ह्यावर पांघरून घालतात. आणि झाकल्यामुळे हे तसेच उभे राहिले आहे. ही निर्बलता काय सांगते की जोपर्यंत मला ओळखणार नाही, तोपर्यंत मी जाणार नाही. संसार कुठेही स्पर्शत नाही. संसार निरपेक्ष आहे. सापेक्ष पण आहे आणि निरपेक्ष