________________
१०६
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
प्रश्नकर्ता : तेव्हा तर ज्ञान नव्हते, आता तर हे ज्ञान मिळाले म्हणून फरक पडला आहे.
दादाश्री : हो ह्यात फरक पडेल पण आधी संसारत जे घुसला आहात त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधावा लागेल. असेच पळून जाता येणार नाही.
प्रश्नकर्ता : प्रत्येक दिवस एक एक करून कमी होत आहे.
दादाश्री : 'माझे' म्हणून मरायचे. खरे तर माझे नाहीच, ती लवकर निघून गेली तर तुम्हाला एकट्याला बसावे लागेल. खरे तर दोघांनी एकत्रच गेले पाहिजे ना? आणि समजा ती जर पती (मेल्या) नंतर सती झाली, तरी पण ती कोणत्या मार्गाने गेली असेल आणि पती कोणत्या मार्गाने गेला असेल? सर्वांची आपापल्या कर्माच्या हिशोबाप्रमाणे गती होते. कोणी जनावरात जातो तर कोणी मनुष्यात जातो, तर कोणी देवगतीत जातो. त्यात जर सती बोलू लागली की, मी तुमच्यासोबत मरेन तर तुमच्यासोबत जन्म घेऊ शकेल. पण असे काही होत नाही. हा तर सर्व वेडेपणा आहे. हे पतिपत्नी असे काहीच नसते नाही. ह्या बुद्धिवंत लोकांनी अशी जुळवा-जुळव करुन ठेवली आहे.
प्रश्नकर्ता : हे भाऊ असे सांगतात की, जर दोघांत कुठल्याही प्रकारची तक्रार नसेल, तर पुढच्या जन्मात परत एकत्र राहू शकतो?
दादाश्री : ह्या जन्मातच राहू शकत नाही. ह्या जन्मातच डायवोर्स (घटस्फोट) होतात, तर मग पुढल्या जन्माची काय वार्ता करता? असे प्रेम असतच नाही ना? येत्या जन्मी एकत्र येणाऱ्या प्रेमवाल्यांमध्ये तर क्लेशच नसतो. ती तर इजि लाइफ (सरळ जीवन) असते. खूप प्रेममय जीवन असते. चुक दिसतच नाही. चुक झाली तरी दिसत नाही. असे प्रेम असते.
प्रश्नकर्ता : तर मग असे प्रेममय जीवन असेल तर येत्या जन्मात तेच पुन्हा एकत्र येतात की नाही?
दादाश्री : हो एकत्र येतात ना, कोणाचे असे जीवन असेल तर एकत्र जन्म घेतात. पूर्ण जीवनभर क्लेश केला नसेल तर ते एकत्र येतात.