________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
१०५
पूर्व जन्मात अतिक्रमण केले होते, त्याचे ह्या जन्मात फळ आले आहे अर्थात् आता त्याचे प्रतीक्रमण कराल तर वजा-बेरीज होईल. म्हणून आता आत त्यांची माफी मागा, पुन्हा पुन्हा माफी मागत रहा की मी जे जे दोष केले असतील त्याबद्दल माफी मागतो. कोणत्याही भगवंताच्या साक्षीने माफी मागा, तर सर्व दोष संपून जातील, अन्यथा काय होईल की त्यांचे जास्त दोष पाहिल्याने, जसे की कोणी स्त्री एखाद्या पुरुषाला जर खूपच दोषित मानत असेल तर त्यामुळे तिचा तिरस्कार वाढेल, आणि तिरस्कार असेल तर भीती वाटेल. ज्याच्याप्रती तिरस्कार आहे त्याचेच तुम्हाला भय वाटते. त्यांना पाहिले की भीती वाटते. ह्यावरुन समजून जायचे की हा तिरस्कार आहे. अर्थात् हा तिरस्कार सोडण्यासाठी आत सतत माफी मागतच रहा. तर मग दोन दिवसातच हा तिरस्कार बंद होईल. त्यांना माहितही नसेल की तुम्ही आतून त्यांची माफी मागत आहात. त्यांच्याप्रती जे जे दोष केले आहेत, 'हे भगवान, मी त्यांची माफी मागतो.' हा माझ्याच दोषांचा परिणाम आहे. कोणत्याही व्यक्ती प्रती जे जे दोष केले असतील, तर त्यासाठी आतून भगवंताकडे त्याची पुन्हा पुन्हा माफी मांगितली तर सर्व दोष धुतले जातील.
प्रश्नकर्ता : आपल्याला धर्माच्या मार्गाने जायचे असेल तर घर-संसार सोडवा लागतो. ते धर्मासाठी चांगले आहेत, पण त्यामुळे घरातील लोकांना दुःख होते. तर स्वत:साठी घर-संसार सोडावा हे चांगले म्हणावे?
दादाश्री : नाही. घरातील लोकांचा हिशोब फेडावाच लागतो. त्यांचा हिशोब फेडल्यानंतर, त्या सर्वांनी खुश होऊन सांगितले की 'तुम्ही जावू शकता' तर काही हरकत नाही. पण त्यांना दु:ख होईल असे काही करु नये. कारण की त्या एग्रीमेन्ट (करार)चा भंग करुन काही करु शकत नाही.
प्रश्नकर्ता : भौतिक संसार सोडण्याचे मनात येत असते मन होते, तर काय करावे?
दादाश्री : एके दिवशी, भौतिक संसारात घुसण्याचे मन करत होते ना!