________________
चिंता
२७
करतो. मी नाही केले तर नाही होणार. आता हे कसे होईल? सकाळी काय होईल? असे म्हणत चिंता करत राहतो.
प्रश्नकर्ता : चिंता कशाला म्हणतात ?
दादाश्री : कुठल्याही वस्तुला सर्वस्व मानून त्याचे चिंतन करणे, त्याला चिंता म्हणतात. बायको आजारी असेल, आता पैसांपेक्षा ही बायको सर्वस्व वाटत असेल तर तिथूनच त्याला चिंता वाटायला लागेल. तिला सर्वात जास्त महत्व दिले म्हणून चिंता घुसेल पण ज्यांच्यासाठी सर्वस्व आत्मा आहे, त्याला मग चिंता कशाची असेल ?
प्रश्नकर्ता : टेन्शन म्हणजे काय ? चिंता तर समजली, आता टेन्शनची व्याख्या सांगा कि टेन्शन कशाला म्हणतात ?
दादाश्री : टेन्शनही त्याचाच अंश आहे. पण त्यात सर्वस्व नाही होत, सगळ्या प्रकारचे तणाव असतील. नोकरीचा ठिकाणा नाही लागत, काय होणार? एका बाजूला बायको आजारी आहे, तिचे काय होईल? मुलगा शाळेत नाही जात, त्याचे काय? ह्या सगळ्या तणावानां टेन्शन म्हणतात. आम्ही तर सत्तावीस वर्षात टेन्शन पाहिलेच नाही ना !
आता सावधानी आणि चिंतामध्ये खूप फरक. सावधानी ही जागृति आहे आणि चिंता म्हणजे जळत राहणे.
नॉर्मालिटीने आहे मुक्ति
प्रश्नकर्ता : परवशता आणि चिंता दोन्ही एकत्र नाही जात?
दादाश्री : चिंता तर एबाव नॉर्मल इगोइझम आहे आणि परवशता इगोइझम नाही. परवशता तर लाचारी आहे आणि चिंता तर एबाव नॉर्मल इगोइझम आहे. एबाव नॉर्मल इगोइझम असेल तर चिंता होईल, नाहीतर नाही होणार. हे रात्री घरी झोप कोणाला नाही येत? तेव्हा म्हणतात, ज्याला इगोइझम जास्त आहे त्याला.