________________
चिंता
इगोइझमचा वापर करायला सांगितला आहे, एबाव नॉर्मल इगोइझमचा वापर करायला नाही सांगितले. अर्थात् चिंता करणे गुन्हा आहे आणि त्याचा परिणाम जनावरगती होते.
प्रश्नकर्ता : चिंता नाही होणार, त्यासाठी उपाय काय ?
दादाश्री : मागे वळायला हवे. परतायला हवे किंवा इगोइझम बिलकुल संपवायला पाहिजे. ज्ञानी पुरूष असेल तर ज्ञानी पुरूष 'ज्ञान' देईल तर सगळे होऊन जाते.
२८
चिंता कशाप्रकारे जाईल
प्रश्नकर्ता : चिंता का नाही सुटत ? चिंतेतून मुक्त होण्यासाठी काय केले पाहिजे?
दादाश्री : चिंता बंद झाली असेल, असा मनुष्यच नाही मिळणार. कृष्ण भगवानांच्या भक्तालाही चिंता बंद नाही होत ना. आणि चिंतेने सारे ज्ञान अंध होऊन जाते, फ्रेक्चर होते.
संसारात एक मनुष्य असा नाही होणार कि ज्याला चिंता नाही होत. साधु-साध्वी सगळ्यांना कधी ना कधी तर चिंता होतच असते. साधुला इन्कमटैक्स नाही होत, सेल्सटैक्स नाही होत, ना भाडे असते, तरी पण कधी ना कधी चिंता असतेत. शिष्या बरोबर झंझट झाली तरी चिंता होते. आत्मज्ञाना शिवाय चिंता जात नाही.
एका तासात तर तुझ्या साऱ्या चिंता मी घेतो आणि गॅरंटी देतो कि, जर एकही चिंता असेल तर वकील करून कोर्टात माझ्यावर केस कर. असे आम्ही हजारो लोकांना चिंता रहित केले आहे. अरे माग, मागेल ते द्यायला तयार आहे मी ! पण जरा असे माग कि जे तुझ्याकडून कधी जाणार नाही. अर्थात् या नाशवंत गोष्टी नका मागू. कायमचे सुख मागून
घ्या.