________________
चिंता
सरकमस्टेन्शियल एविडन्स एकत्र होतात, तेव्हा कार्य होत असते. (म्हणजेच व्यवस्थित शक्ति)आमच्या हातात सत्ता नाही. आपल्याला संयोग बघायला पाहिजे कि संयोग कसा आहे. संयोग एकत्र होतात, तेव्हा कार्य होऊन जातेच. कोणी मनुष्य मार्च महिन्यात पावसाची आशा करेल तर ते चुक म्हणावे लागेल. आणि जूनची पंधरा तारीख आली, संयोग एकत्र झाले, काळाचा संयोग तर गोळा झाला, पण ढगांचा संयोग नाही मिळाला, तर बिना ढगांचा पाउस कसा होणार? पण ढग जमले, काळ येऊन मिळाला, मग विजा कडकडल्या, सर्व एविडन्स गोळा झाले, कि मग पाउस पडणारच. अर्थात् संयोग मिळाले पाहिजेत. मनुष्य संयोगाधीन आहे, पण तो असे मानतो कि, मी काहीतरी करतो पण तो कर्ता आहे, हे पण संयोगाधीन आहे. एक संयोग विखुरला, तर त्याने ते कार्य नाही होऊ शकत.
'मी कोण आहे' हे जाणण्याने कायमचा उपाय
२६
वास्तवात तर 'मी कोण आहे' हे जाणले पाहिजे ना, स्वत:वर बिजनेस करणार तर मृत्यु नंतर बरोबर येईल. नांवावर बिजनेस केला तर आपल्या हातात काही नाही राहणार. थोडे फार समजायला हवे कि नको? 'मी कोण आहे' हे जाणावे लागेल ना.
इथे आपल्याला उपाय काढून दिला, मग चिंता - वरिझ काहीच होणार नाही कधी. चिंता होते, हे चांगले वाटते का? का नाही वाटत?
अनंत काळापासून भटकत राहतात हे जीव, अनंत काळापासून ! तेव्हा कधीतरी एखाद्या वेळेस असे प्रकाशस्वरूप ज्ञानी पुरूष मिळतात, तेव्हा सुटकारा मिळवून देतात.
टेन्शन वेगळे, चिंता वेगळी
प्रश्नकर्ता : तर त्या चिंते बरोबर अहंकार कशाप्रकारे ?
दादाश्री : मी नसेल तर चालणार नाही, असे त्याला वाटते. हे मीच