________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार सेवा करत नाही, त्यात आई-वडीलांचा काय दोष? मी म्हणतो, 'त्यांनी त्यांच्या आई-वडीलांची सेवा केली नव्हती, म्हणून त्यांना सेवा मिळत नाही.' अशी परंपराच चुकीची आहे. आता जुन्या परंपरेला बाजूला सारुन नवीन सुरुवात केली तर उत्तम ठरेल. वडीलधाऱ्यांची सेवा केल्याने आपले विज्ञान विकसित होत जाते. मूर्तीची सेवा करू शकता का? मूर्तीचे काय पाय दुःखतात? सेवा तर पालक, वडीलधारी किंवा गुरूजन असतील, त्यांची करायची असते. आई-वडीलांची सेवा करणे हा धर्म आहे. हिशोब कसाही असो पण सेवा करणे आपला धर्म आहे. आपला सेवा धर्म जेवढा पाळणार, तेवढे सुख आपल्याला मिळेल. वडीलधाऱ्यांची सेवा तर होईलच, परंतु त्यासोबत आपल्याला सुख पण प्राप्त होईल. आई-वडीलांना सुख दिले तर आपल्याला सुख मिळेल. वडीलधाऱ्यांची सेवा करणारा मनुष्य तर कधीच दु:खी होत नाही. एक भाई मला एका मोठ्या आश्रमात भेटलेत. मी त्या विचारले, 'तुम्ही येथे कसे ?' तेव्हा त्यांनी सांगितले, 'मी या आश्रमात गेल्या दहावर्षापासून रहात आहे.' तेव्हा मी त्यांना सांगितले, 'तुमचे आई-वडील उतारवयात गावी गरीबीत खूपच दु:खी आहेत.' तेव्हा तो म्हणाला, 'त्यात मी काय करू? मी त्यांच्याकडे लक्ष दिले, तर माझा धर्म राहून जाईल.' याला धर्म कसे म्हणणार? धर्म तर, जो आई-वडीलांची काळजी घेतो, भावांना बोलवतो, सगळ्यांना बोलवतो त्यास धर्म म्हणावा. व्यवहार आदर्श असायला हवा. जो व्यवहार स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करतो, आईवडीलांच्या संबंधाला पण धुत्कारतो, त्यास धर्म कसे म्हणू शकतो? मी पण आईची सेवा केली होती. तेव्हा मी वीस वर्षाचा होतो. तरुणवयात आईची सेवा केली होती. वडीलांना खांदा दिला होता, त्यांची एवढीच सेवा झाली होती. नंतर हिशोब समजून गेलो की अरे, असे कित्येक वडील मागच्या जन्मी होऊन गेलेत. तर आता काय करणार? उत्तर मिळाले, 'जे आहेत त्यांची सेवा करा.' मग जे गेले ते गेलेत. परंतु आता जे आहेत त्यांची सेवा करा. जर असे कोणी असतील तर ठीक, नसेल तर चिंता करू