________________ 100 आई-वडील आणि मुलांचा व्यवहार नका. असे तर खूप होऊन गेलेत. आता जे आहेत त्यांची सेवा करा. आईवडीलांची सेवा ही प्रत्यक्ष आहे. भगवंत दिसतात का? भगवंत तर दिसत नाही, पण हे आई-वडील तर दिसतात. आता जास्तीत जास्त जर कोणी दुःखी असतील तर 65 वर्ष (आणि त्याहून अधिक) वयाची माणसं खूप दु:खी आहेत. परंतु ते कोणाला सांगतील? मुले लक्ष देत नाहीत. जुन्या पिढीत आणि नव्या पिढीत मोठी दरी निर्माण झाली आहे. म्हातारा जुन्या पद्धती सोडत नाही, मार खातो तरी सुद्धा सोडत नाही. प्रश्नकर्ता : प्रत्येकाचे वय 65 वर्षाचे झाल्यावर हेच हाल होत असतात ना? दादाश्री : होय, असेच हाल होतात. असेच्या असे हाल! म्हणून ह्या काळात वास्तवात करण्यासारखे काय आहे? एखाद्या ठिकाणी ह्या वडीलधाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली असेल तर अति उत्तम. असा मी विचार केला होता. नंतर आम्ही विचार केला की असे काही केले असेल, तर आधीच त्यांना आमचे हे 'ज्ञान' द्यायचे, मग त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तर दुसऱ्या सामाजिक संस्थांकडे सोपविले तरी चालेल. परंतु ज्ञान दिलेले असेल तर मग दर्शन करत राहिलेत तरी पण काम चालेल! हे ज्ञान दिले असेल तर बिचाऱ्यांना शांति राहिल, नाहीतर कशाच्या आधारे शांती राहिल? तुम्हाला काय वाटते? आता तुमच्या घरातील मुलांवर संस्कार कसे घडून येतील? तुम्ही तुमच्या आई-वडीलांना नमस्कार करा. ह्या वयात तुमचे केस पांढरे झाल्यावर पण तुम्ही तुमच्या आई-वडीलांना नमस्कार करीत असाल तर मुलांच्या मनामध्ये पण असे विचार येतील की पप्पा लाभ घेतात तर आम्ही का लाभ घेऊ नये? तेव्हा मग तुम्हाला नमस्कार करतील की नाही? प्रश्नकर्ता : आज-कालची मुले आई-वडीलांना नमस्कार करीत नाहीत. त्यांना संकोच वाटतो. दादाश्री : असे आहे, आई-वडीलांना नमस्कार का करत नाही?