________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार आपल्यासाठी काय कामाची? आता जी आहे ती चांगली. दुसऱ्यांची गोरी आई पाहून, 'आपली आई वाईट आहे' असे नाही बोलायचे. 'माझी आई तर खूपच छान आहे' असे बोलायला पाहिजे. प्रश्नकर्ता : वडीलांचे काय ऐकायला पाहिजे ? दादाश्री : वडीलांचे? ज्याच्यामुळे ते राजी-खुषी रहातील असा व्यवहार त्यांच्याशी ठेवायचा. त्यांना राजी ठेवता येत नाही का? ते राजीखुशी रहातील असे करा.. आई-वडील ते आई-वडीलच. ह्या जगात सर्व प्रथम सेवा करण्यायोग्य जर कोण असेल तर ते आई-वडील आहेत. त्यांची सेवा करशील? प्रश्नकर्ता : होय दादाजी, सेवा चालूच आहे. घर कामात मदत करतो. दादाश्री : शांतीचे काय करशील? जीवनात शांती आणायची आहे की नाही आणायची? प्रश्नकर्ता : शांती आणायची आहे. दादाश्री : तर शांति आणून देईल, पण कधी आई-वडीलांची सेवा केली का? आई-वडीलांची सेवा करशील तर शांती जाणार नाही. परंतु आज-काल मनापासून आई-वडीलांची सेवा करत नाही. मुलगा पंचवीसतीस वर्षाचा झाला आणि 'गुरू' (पत्नी) आली, ती सांगते की मला नवीन घरी घेऊन चला. तुम्ही गुरू पाहिला आहे का ? पंचवीस-तीस वर्षाच्या वयात 'गुरू' भेटून जातो आणि 'गुरू' भेटल्यावर सर्व काही बदलते. गुरू सांगते आईंना तुम्ही ओळखतच नाही. सुरूवातीला तर तो लक्ष देत नाही. सुरूवातीला तर ऐकले न ऐकल्या सारखे करतो, परंतु दोन-तीनदा सांगितल्यावर मग हळू हळू तिच्याच बाजूने होतो. आई-वडीलांची जर शुद्धभावनेने सेवा केली तर त्याला कधी अशांती होत नाही असे हे जग आहे. हे जग काही दुर्लक्ष करण्यासारखे नाही. म्हणून तर जगातील विचारतात की मुलाचाच दोष आहे ना! मुले आई-वडीलांची