________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार तेव्हा म्हणाली, 'मी काय करायचे?' मी तिला समजावले, त्याचा मूड पाहून व्यवहार करायला हवा, जेव्हा त्याचा मूड ठीक नसेल तेव्हा आपण मनातल्या मनातच 'अल्ला' चे नामस्मरण करायचे आणि मूड ठीक असेल तेव्हा त्याच्याशी बातचीत करायची. तो मूडमध्ये नसेल आणि तू त्याची खोड काढलीस तर भडका उडेल.' तू त्याला निर्दोष च पहायचे. तो तुला उलट-सुलट बोलला तरी पण त शांत रहायचे. खरे प्रेम असायला हवे. आसक्तिमध्ये तर सहा-बारा महिन्यात सर्व तूटुनच जाईल. प्रेमात सहनशीलता असायला हवी, एडजस्टेबल (समाधानी) असायला हवे. __ तर अशी शिकवण मशरूरला दिली. मी सांगितले, 'तू काहीही करायचे नाही, त्याने जरी समोरुन तुझ्यावर तीर चालवले तरीही आपण आपली स्थिरता ठेवून 'दादा, दादा' करीत रहायचे. तू एकपण तीर फेकू नकोस.' मग मी विधि करुन दिली. ___ नंतर तिला विचारले की, 'तुझ्या घरी कोण कोण आहेत?' तेव्हा म्हणाली, 'माझी सासू आहे.' मी विचारले, 'सासू बरोबर कशी एडजस्टमेन्ट करणार?' तेव्हा म्हणाली, 'सासुला तर माझा इंगा दाखवेल.' नंतर मी तिला समजावले. मग ती म्हणाली, 'हो, दादाजी, तुम्ही सूचवलेल्या सर्व गोष्टी मला पटल्यात.' तू अशाप्रकारे वागशील तर तलाक देणार नाही आणि सासूसोबत पण जूळून राहिल. नंतर मग तिने मला एक चंदनाचा हार घातला. मी सांगितले, 'हा हार तू घेऊन जा आणि तुझ्या सोबत ठेव, हाराचे दर्शन करुन पतीसोबत आपला व्यवहार करत जा, तर सर्व खूप छान चालेल. तिने तो हार आजसुद्धा आपल्या सोबत सांभाळून ठेवला आहे.' तिला चारित्र्यबळाच्या बाबतीत सांगितले होते की पती काहीही बोलेल, तुझ्यासोबत कसेही वागेल, तेव्हा तू फक्त मौन धारण करुन, शांतपणे पाहत रहाशील तर तुझ्यात चारित्र्यबळ उत्पन्न होईल आणि त्याचा प्रभाव पडेल, वकील असला तरीही. तो कसाही रागावला, 'दादा' चे नांव घ्यायचे आणि स्थिर रहायचे. तेव्हा त्याला वाटेल की कशी स्त्री आहे ही! ही तर हरतच नाही. नंतर मग तो स्वतः हरेल. मग तिने असेच केले,