________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार होईल, तुला घटस्फोट हवा आहे ? ही पद्धत चुकीची आहे. नंतर मी तिला सांगितले, 'तुझा घटस्फोट होऊ नये त्यासाठी मी तुला हे सर्व शिकवतो' त्यावर मला सांगते, 'दादाजी मी असे करू नको तर मग काय करू? नाही तर तो मला दाबून टाकेल.' मी सांगितले, 'तो काय तुला दाबून टाकेल? बिचारा लॉयर! नंतर मग मी विचारले, 'ताई, माझे सांगितलेले स्विकारशील? तुला सुखात रहायचे आहे की दुःखात? बाकी ज्या स्त्रिया सर्व तयारी करुन पतीकडे गेल्यात, त्या शेवटी दुःखी झाल्यात. तू माझ्या सांगण्याप्रमाणे जा, कोणत्याही तयारीशिवाय जा.' मग तिला सर्व काही समजावले. घरात दररोज क्लेश होईल तर वकील म्हणेल, 'जळो, हिला सोडून हिच्याऐवजी दुसरी आणतो.' त्यामुळे मग हे टिट फॉर टॅट (जशास तसे) होईल. जेथे प्रेमाचे सौदे करायचे आहेत, तेथे असे कश्यासाठी? सौदे कशाचे करायचे आहेत? प्रश्नकर्ता : प्रेमाचे. दादाश्री : प्रेमाचे. भले आसक्तियुक्त असो पण प्रेमा सारखे आहे ना ! त्याच्यावर द्वेष तर होत नाही ना ! मी सांगितले, 'असे नाही करायचे, तू सुशिक्षित आहेस म्हणून अशी तयारी करुन ठेवली आहेस? हे तर वॉर (लढाई) आहे ? हे काय हिन्दुस्थान आणि पाकिस्तानची लढाई आहे? जगामध्ये सर्व हेच करत आहेत. ही मुले-मुली सगळे हेच करत आहेत. त्यामुळे तर दोघांचेही जीवन बिघडते.' नंतर मी तिला सर्व प्रकारे समजावले. पतीसोबत अशाप्रकारे वर्तन करायला हवे. अशाप्रकारे म्हणजे तो तिरसटपणे वागत असेल तर तु सरळ वाग. त्याचे समाधान व्हायला हवे, मार्ग काढायला हवा. त्याला भांडण करायचे असेल तरी आपण एकता ठेवायला हवी. तो सारखे वेगळे होण्याची भाषा करीत असेल तरी त्या परिस्थितीत सुद्धा आपण सांगायचे की आपण एकच आहोत. कारण की, हे सर्व रिलेटिव संबंध आहेत. त्याने संबंध तोडले आणि आपण ही संबंध तोडले तर लगेच संबंध तुटून जातील. म्हणजे तो तलाक देऊन टाकेल.