________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार नंतर मग मी तिला विचारले की, 'तो पती झाल्यावर तुला काही दु:ख नाही देणार? आता तर तुला कुठल्याही प्रकारचे दु:ख नाही आहे पण पती करायला जाशील आणि पतीने दु:ख दिले तर?' मी म्हणालो, 'त्याच्या बरोबर लग्न झाल्यानंतर तुझी काही योजना असेल ना की त्याच्या बरोबर कसे वागायचे? की तू योजनाच नाही केलीस? तेथे लग्नांतर काय करायचे त्यासाठी तू काही योजना आखली असेलच ना, की लग्नानंतर त्या लॉयर बरोबर तुझे जमते की नाही याची?' तेव्हा ती म्हणाली, 'मी सगळी तयारी करुन ठेवली आहे. तो असा बोलला तर मी त्याला समोरुन असे उत्तर देईन. तो असे बोलला तर मी असे बोलेल, तो असा म्हणाला तर, अश्या प्रत्येक बाबतीत माझ्या जवळ उत्तरे तयार आहेत.' जशी रशियाने अमेरिका बरोबर युद्धची तयारी केली होती ना, तशीच तिने पण तयारी करुन ठेवली होती. दोन्हीबाजूनी पुर्ण तयारी. तिने तर मतभेद उभे करण्याचीच तयारी करुन ठेवली होती. तो भांडण करेल त्या अगोदरच ही बॉम्ब फोडणार! त्याने असे पेटवले तर मी पण असे पेटवून देईल. अर्थात् तेथे जाण्याच्या अगोदरच हल्ला करण्यास तयार ना! त्याने असे तीर सोडले तर आपण ह्या बाजूने रॉकेट सोडायचे. मी म्हणालो, 'हे तर तू कोल्डवॉर(शीतयुद्ध) उभे करशील. कधी शमणार हे?' शीतयुद्ध कधी बंद होते का ? हे पहा ना, रशिया-अमेरिकासाररव्या मोठ-मोठ्या साम्राज्यावाद्यांचे सुद्धा बंद होत नाही ना? ह्या मुली असे सर्व विचार करतात, अश्याप्रकारे त्या सर्व नक्की करतात. ही मुले तर बिचारी भोळी-भाबडी असतात. मुले असे सर्व काही करत नाहीत. आणि त्या परिस्थितीत मग मार खातात, भोळे असतात ना! हे जे तुम्ही सांगतात ना, कावेबाजी होत असेल तर काय तयारी करुन ठेवायला हवी? परंतु त्यामुलीने संपूर्ण तयारी करुन ठेवली होती, बोम्बार्डिंग केव्हा आणि कशी करायची! तो असा बोलला तर असा अटॅक, तसा बोलला तर असा अटॅक (आक्रमण) 'संपूर्ण तयारी करून ठेवली आहे असे सांगितले!' मग मी मधेच तिला विचारले, 'हे सर्व तुला कोणी शिकवले? घरातून हाकलून लावेल आणि तलाक (घटस्फोट) देईल !' घटस्फोट देईल की नाही देणार? मी सांगितले की याप्रमाणे तर सहा महिन्यात घटस्फोट