________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार असेल तर तेथे सुख कधीही नसते! म्हणून एकमेकांशी सिन्सियर असायला हवे. लग्नापूर्वी दोघांच्या चूका झाल्या असतील, त्या आम्ही स्विकार करवून देतो. आणि मग एग्रीमेन्ट (करार) करुन देतो की, आता एकमेकांशी सिन्सियर रहायचे. दुसरीकडे पहायचे नाही. जीवनसाथी पसंत असो अथवा नसो, तरी पण सिन्सियर रहायचे. आपली आई आवडत नसेल, तिचा स्वभाव खराब असेल तरी पण तिच्या प्रति सिन्सियर राहतोच ना! प्रश्नकर्ता : संसार व्यवहारात पूर्वी जी कर्मे झाली आहेत, त्याच्या उदयानुसार सर्व चालत असते. त्यात काही कावेबाजी होत असल्याचे माहित पडले की माझ्यापाठी कावेबाजी रचली जात आहे, तर मग अशा परिस्थितीत 'समभावाने निकाल' करण्यासाठी काय करायला हवे? दादाश्री : तिरसट पती मिळाला असेल तर त्याला कशाप्रकारे जिंकायचे? कारण की जे प्रारब्धात लिहिले गेले आहे ते तर आपल्याला सोडणार नाही ना! आणि आपल्या मनाप्रमाणे होत नाही असा हा संसार आहे. तर तू मला सांग की 'दादाजी, असा पती मिळाला आहे.' तर मी लगेच तुला ते सर्व रिपेअर करुन देईल आणि तुला चांगले जीवन जगण्यासाठी किल्ली पण देईल. औरंगाबादला एक मुसलमान मुलगी आली होती. मी तिला विचारले, 'काय नांव आहे तुझे?' तेव्हा ती म्हणाली, 'माझे नांव मशरूर आहे.' मी तिला सांगितले, 'ये, इकडे माझ्या जवळ बैस, कसे येणे केले?' ती आली. आल्यावर तिच्या मनाला बरे वाटले. असे पाहताक्षणी तिला बरे वाटले, आतून शांती वाटली की हे खुदाचे आसिस्टन्ट (सहाय्यक) असल्या सारखे वाटतात. असे वाटल्यावर मग ती बसली. नंतर मग दुसऱ्या गोष्टी निघाल्या. नंतर मी विचारले, काय करतेस तू ?' त्यावर ती म्हणाली, 'मी लेक्चरर (व्याखाता) आहे.' मग मी विचारले, 'लग्न-बिग्न केले की नाही केले ?' तर ती म्हणाली, 'नाही लग्न नाही केले, परंतु सगाई (साखरपुडा) झाला आहे.' मी विचारले, 'सगाई कुठे झाली आहे, मुंबईत?' तर ती म्हणाली, 'नाही, पाकिस्तानात' 'लग्न केव्हा करणार आहेस?' तेव्हा म्हणाली, 'सहा महिन्यातच.' मी विचारले, 'कोणासोबत? पती कसा शोधून काढलास?' तर म्हणाली, 'लॉयर आहे (वकील).'