________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार आपल्या येथे लग्नानंतर दोघे संपूर्ण जीवन सिन्सियरली (प्रमाणिकपणे) रहातात. ज्यांना सिन्सियरली जगायचे असेल, त्यांनी सुरुवातीपासूनच दुसऱ्या व्यक्तिसोबत फ्रेन्डशिप ठेवायची नाही. अशा बाबतीत खूपच कडक राहिले पाहिजे. कोणत्याही मुलासोबत फिरायचे नाही. आणि फिरायचेच असेल तर एकच मुलगा नक्की करुन आई-वडीलांना सांगून टाकायचे की लग्न करणार तर ह्याचा बरोबरच करेन, मला दुसऱ्या कोणाशीही लग्न करायचे नाही. इन्सिन्सियर लाइफ इज वाइल्ड लाइफ. (अप्रमाणिक जीवनच रानटी जवीन आहे) चारित्र्य वाईट असेल, व्यसनी असेल, अश्या तर खूप अडचणी असतात. व्यसनी आवडतो की नाही ? प्रश्नकर्ता : अजिबात नाही. दादाश्री : आणि चारित्र्य चांगले आहे पण व्यसनी असेल तर? प्रश्नकर्ता : सिगारेटपर्यंत चालवून घेईन. दादाश्री : खरे आहे तुझे. सिगारेटपर्यंत निभावू शकतो. पण त्यानंतर तो ब्रांडीचा पेग भरून पिणार ते कसे निभावायचे? त्याची काही सीमा असते. आणि चारित्र्य तर खूप मोठी वस्तु आहे. तू चारित्र्यला मानते? चारित्र्य पसंत आहे तुला? प्रश्नकर्ता : त्याशिवाय तर जगायचेच कसे? दादाश्री : हो, पहा! हिन्दुस्थानी स्त्रिया ! मुली जर एवढे समजतील ना तर काम होऊन जाईल. जर चारित्र्यला समजलात तर काम फत्ते होऊन जाईल. प्रश्नकर्ता : चांगल्या वाचनामुळे आमचे विचार एवढे उंच झाले आहेत. दादाश्री : वाचनाने एवढे चांगले संस्कार मिळाले ना! बाकी वास्तवात तर हे सर्व दगा-फटका आहे. तुम्हा सगळ्यांना दिसत नाही, मला तर सर्व काही दिसते, केवळ दगाच आहे. आणि दगा दिला