________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार चांगला होता. मला पण चांगला वाटला. त्याला कसे जाऊ देऊ? मुलगी काय समजली, थोडासा ढिला आहे. तर ठीक करुन घे ना नंतर, परंतु असा दुसरा मिळणार नाही!! प्रश्नकर्ता : डेटिंग करणे पाप आहे का? डेटिंग म्हणजे मुलांनी मुलींच्या सोबत बाहेर जाणे आणि मुलींनी मुलांच्या सोबत बाहेर जाणे, तर हे पाप आहे ? त्याला काही हरकत आहे? दादाश्री : होय. मुलांच्या सोबत फिरायची इच्छा होत असेल तर लग्न करुन घ्यायचे. नंतर एकच मुलगा पसंत करायचा, एक नक्की करुन टाकायचा. नाहीतर अश्याप्रकारचा गुन्हा करायचा नाही. जोपर्यंत लग्न होत नाही, तोपर्यंत तू मुलांच्या सोबत फिरायला नको. प्रश्नकर्ता : येथे अमेरिकेत तर असे आहे की, मुले-मुली चौदा वर्षाची झाल्यावर बाहेर फिरायला जातात. नंतर मग जमले तर पुढे ही जातात. त्यात जर काही बिनसले, तर मग दुसऱ्याच्या सोबत फिरायला जातात. परत दुसऱ्यासोबत पण जमले नाही तर मग तिसरा, असे चक्र चालू असते आणि एकावेळी दोन-दोन, चार-चारजणांसोबत सुद्धा फिरतात. दादाश्री : टॅट इज वाईल्डनेस, वाईल्ड लाईफ!(हा तर जंगलीपणा आहे, जंगली जीवन!) प्रश्नकर्ता : तर त्या लोकांनी काय करायला हवे? दादाश्री : मुलीला एका मुलासोबत सिन्सियर (प्रमाणिक) रहायला हवे आणि मुलगा मुलीच्या प्रति सिन्सियर रहायला हवा, असे जीवन असायला हवे. अन्सिन्सियर लाइफ ते रोंग लाइफ आहे. प्रश्नकर्ता : आता ह्यामध्ये सिन्सियर कसे राहता येईल? एकदुसऱ्यांसोबत फिरत असतात, त्यामुळे नंतर मुलगा किंवा मुलगी इन्सिन्सियर होऊन जातात. दादाश्री : अशा वेळी फिरणे बंदच करायला हवे ना! लग्न करुन घ्यायला हवे. आफ्टर ऑल वी आर इंडियन, नोट वाइल्ड लाइफ. (शेवटी आपण भारतीय आहोत, रानटी नाही.)