________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार मुलगी पसंत करण्यात हुशार आहे.' त्या लोकांनी आपआपसात ठरवले होते की आई जी पसंत करेल तीच. तर अशाप्रकारे सर्व असायला हवे. प्रश्नकर्ता : माझी ही लहान मुलगी विचारते की, असे कसे लग्न करायचे. मग तर आपले संपूर्ण जीवनच बिघडून जाईल ना? त्यामुळे आधीच मुलाला चांगल्या प्रकारे पहायचे आणि माहिती करुन घ्यायची की, मुलगा चांगला आहे की नाही, नंतर लग्न करायचे ना ! असे ती मला प्रश्न विचारते. तर यावर उपाय काय आहे दादाजी? दादाश्री : सर्व पाहूनच लग्न करतात तरीही नंतर भांडण हाणामारी होतेच. ज्यांनी न पहाता लग्न केले, त्यांचे खूप चांगले चालते कारण की ते निसर्गाने दिले आहे पण तेथे तर आपली हुशारी वापरली ना. आपल्या एक महात्माच्या मुलीने काय केले? तर तिने आपल्या वडीलांना सांगितले की, 'मला हा मुलगा पसंत नाही.' आता मुलगा शिकला-सवरलेला होता. मुलीच्या आई-वडीलांना सर्वांना तो मुलगा खूपच पसंत होता. म्हणून तिचे वडील व्याकूळ झाले, कारण मोठ्या प्रयासाने असा चांगला मुलगा मिळाला होता आणि त्याला ही मुलगी नाकारते आहे. थकलेला माणूस मग सावलीखाली बसतो, तसे त्यांनी मला हे सर्व सांगितले त्यावर मी म्हणालो. 'त्या मुलीला माझ्या जवळ आणा.' मी विचारले, 'बेटा, मला सांग की ह्या स्थळाला तुझी काय हरकत आहे? मुलगा, उंच वाटतो आहे ? जाडलठ्ठ आहे? किडमिडी आहे ?' तेव्हा म्हणाली, 'नाही, थोडा ब्लॅकीश (काळा-सावळा) आहे.' मी म्हणालो 'ते तर मी उजळून देईन, अजून काही तुला अडचण आहे ?' तर म्हणाली, 'नाही, अजून काही नाही.' यावर मी सांगितले, 'तू होकार कळवून दे ना! नंतर मी त्याला उजळून टाकेन.' त्यानंतर मुलगी तिच्या वडीलांना म्हणाली, 'तुम्ही दादाजींपर्यंत माझी तक्रार घेऊन गेलात?' तेव्हा काय करणार मग? लग्नानंतर मी त्या ताईला विचारले, 'काय ताई, त्याला उजळवण्यासाठी साबण मागवून देऊ का?' तेव्हा ती म्हणाली, 'नाही दादाजी, उजळच आहे.' विनाकारण ब्लॅकिश, ब्लॅकिश करत होती! ते तर काही काळे लावले तर काळा दिसेल आणि पिवळा लावला तर पिवळा दिसेल! खरे तर मुलगा