________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार 87 तुम्ही तर एकाच प्रकारच्या विटामिनला विटामिन म्हणता, ते बुद्धिचे विटामिन आहे. परंतु ज्ञान तर दोघांना विटामिन म्हणते. ते विटामिन चांगले की खूप काही खाण्यास उपलब्ध असले, तरी सुद्धा लोक तप करतात. चविष्ट भाजी-बीजी सर्व काही असेल, तरी सुद्धा लोक तप करतात. तप करतात म्हणजे दुःख भोगतात, कारण की आत्माचे विटामिन मिळावे म्हणून. हे असे तुमच्या ऐकण्यात आले नाही का? प्रश्नकर्ता : होय, आले आहे दादाजी. दादाश्री : आणि हे तप घरी बसल्या बसल्या आपणहून मिळते. लव मॅरेज मात्र पसंत करण्यासारखी वस्तू नाही. उद्या त्याचा तोरा कसा निघेल कोणास ठाऊक? आई-वडील शोधतील त्याला तुम्ही पाहावे की तो मुलगा वेडपट अथवा डिफेक्टिव तर नाही ना? वेडपट असायला नको! वेडपट असतात का? ___ आपल्याला पसंत पडेल असा हवा. थोडासा आपल्या मनाला भावेल असा हवा. बुद्धिच्या लिमिटमध्ये यायला हवा. अहंकार स्विकारेल असा हवा आणि चित्त आकर्षित होईल असाही हवा ? चित्तला आकर्षित करेल असा हवा ना? अर्थात् आई-वडील शोधतील त्यास काही हरकत नाही, परंतु आपण स्वतः सुद्धा पाहून घ्यायला हवे. प्रश्नकर्ता : कधी-कधी आई-वडील सुद्धा मुलगा शोधण्यात चुक करू शकतात? दादाश्री : त्यांचा हेतू तसा नसतो, त्यांचा हेतू तर भलं करण्याचाच असतो. त्यातूनही चुक झाली तर ते आपल्या प्रारब्धाचा खेळ आहे. काय करणार? आणि तुम्ही जे स्वतंत्रपणे शोधता त्यात तर चूक होण्याची शक्यता जास्त आहे. बरीच अशी फेल झाल्याची उदाहरणे आहेत. आपले ज्ञान घेतलेले एक महात्मा होते, त्यांचा एकुलताएक मुलगा होता. मी त्याला विचारले, 'अरे! तुला लग्न करायचे आहे की नाही?' तो म्हणाला, 'करणार दादाजी.' 'कशी मुलगी पसंत करणार?' तेव्हा म्हणाला, 'आपण सांगाल तसे करणार.' मग स्वतःहूनच म्हणाला, 'माझी आई तर