________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार मुलींना विचारतो की लग्न का करीत नाही? तेव्हा सांगतात, 'काय दादाजी, तुम्ही पण आम्हाला लग्न करायला सांगतात !' तेव्हा मी सांगतो, 'ह्या जगात लग्न केल्याशिवाय गत्यंतर नाही किंवा मग ब्रह्मचर्य पाळायचे आहे असे ठरवा आणि ते सुद्धा एकदम पक्के, ठाम ठरवलेले असले पाहिजे. असे जर होत नसेल तर लग्न करुन घ्या. परंतु दोन्हींपैकी एकामध्ये येऊन जा.' तेव्हा सांगतात, 'कशाला लग्न करायला सांगता?' मी विचारले, का बरे? त्यात काय अडचण आहे? कोणी चांगला मुलगा मिळत नाही? तर म्हणाली, 'चांगली मुले कुठे आहेत? बावळट आहेत, अश्या बावळटांबरोबर कशाला लग्न करायचे?' हे ऐकून मी स्तब्ध झालो. मी म्हणालो, 'ह्या मुली कश्या आहेत? पहा तर, आतापासून ह्यांची एवढी पावर आहे, तर मग नंतर त्याला कसे जगू देतील, बिचाऱ्यांना?' म्हणून बरीच मुले मला सांगतात, 'आम्हाला लग्न करायचे नाही.' मुली म्हणतात, 'बावळटा बरोबर का लग्न करू ?' मी सांगितले,' असे बोल नकोस. तो बावळट आहे हे तुझ्या मनातून काढून टाक. कारण की लग्न केल्याशिवाय तर सुटका च नाही.' असे नाही चालत. मनात बावळट आहे असे घुसले तर मग नेहमी भांडणे होतील. तुला तो नेहमी बावळटच वाटत राहणार. संपूर्ण जग मोक्षाकडेच जात आहे, परंतु मोक्षासाठी हे सगळे हेल्पिंग (सहाय्यक) होत नाही. अशी भांडणे करुन उलट ब्रेक लावतात. नाहीतर उष्णतेचा असा स्वभाव आहे की ती पाऊस खेचून आणते. जेथे कुठे असेल तेथून खेचून आणते. उष्णतेचा स्वभाव आहे, वाढत वाढत जायचे आणि पाऊसाला खेचून आणायचे. अर्थात् हे जग घाबरुन जाण्यासारखे नाही आहे. संसाराचा स्वभाव असा आहे की आपणास मोक्षाकडे घेऊन जातो. मोक्षला खेचून आणतो. संसार जेवढा जास्त कठीण असेल ना, तेवढा मोक्ष लवकर येतो. परंतु जेव्हा कठीण असेल तेव्हा आपण खचून जायला नको. स्थिर रहायला हवे. योग्य उपाय करण्यासारखे आहेत. चुकीचे उपाय केल्यामुळे मग पडायला होते. दु:ख आल्यावर एवढेच समजायचे की माझ्या आत्म्यासाठी विटामिन मिळाले आहे. आणि सुख मिळाले तर देहाला विटामिन मिळाले, अश्या प्रकारे चालायचे. आपल्याला दररोज विटामिन मिळत असते, आम्ही तर असे मानून लहानपणापासून निवांत राहिलो होतो.