________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि १०९ सर्वाश्रमानुपादाय खाश्रमेण कलत्रवान् ।
व्यसनार्णवमत्येति जलयानैर्यथार्णवम् ॥३।१४।१७ ज्याप्रमाणे नावाडी नौकेच्या योगाने दुसऱ्या लोकांसह समुद्रांतून तरून जातो, त्याप्रमाणे सपत्नीक पुरुष आपल्या गृहस्थाश्रमाच्या योगाने इतर आश्रमी लोकांस बरोबर घेऊन (त्यांना अन्नवस्त्रादिक देऊन ) संकटरूपी सागरांतून तरून जातो. ११. सर्वाः समुद्धरेद्राजा पितेव व्यसनात्प्रजाः॥११।१७।४५
ज्याप्रमाणे बाप आपल्या मुलांना संकटांतून सोडवितो, त्याप्रमाणे राजाने आपल्या प्रजांना संकटांतून सोडवावें. १११ साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहम् ।
मदन्यत्ते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि ॥९।४।६८ (भगवान् विष्णु दुर्वास ऋषींना म्हणाले.) साधु हे माझें हृदय आहेत (साधु हे मला फार प्रिय आहेत ) आणि मी साधूंचे हृदय आहे ( मी त्यांना फार प्रिय आहे) कारण ते माझ्याहून दुसरी प्रिय वस्तु कोणतीही जाणत नाहीत आणि मीही त्यांच्याहून प्रिय असलेली दुसरी स्वल्पही वस्तू जाणत नाही. ११२ साधुषु प्रहितं तेजः प्रहर्तुः कुरुतेऽशिवम् ॥९।४।६९
साधूंवर गाजविलेलाप्रभाव प्रहार करणान्याचेच अकल्याण करितो. ११३ सुखदुःखदो न चान्योऽस्ति
यतः स्वकृतभुक् पुमान् ॥१०॥५४॥३८ मनुष्याला सुख किंवा दुःख देणारा दुसरा कोणीच नाही. तर तो आपण स्वतः केलेल्या कर्मानेच सुख किंवा दुःख भोगीत असतो.
For Private And Personal Use Only