________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१०५ संकीर्त्यमानो भगवाननन्तः
- श्रुतानुभावो व्यसनं हि पुंसाम् । प्रविश्य चित्तं विधुनोत्यशेष
यथातमोऽर्कोऽभ्रमिवातिवातः॥ १२।१२।४७ ज्याप्रमाणे सूर्य अंधकाराचा नाश करतो, किंवा प्रचंड वारा मेघांना वितळून नाहींसें करितो, त्याप्रमाणे भगवान् अनंताचें कीर्तन केले असतां, अथवा त्याचा प्रभाव श्रवण केला असतां तो भगवान् कीर्तन किंवा श्रवण करणा-या मनुष्यांच्या हृदयांत प्रवेश करून त्यांची सर्व दुःखें नाहींशी करितो. १०६ संनिकर्षोत्र मानामनादरणकारणम् । गाङ्गं हित्वा यथान्याम्भस्तत्रत्यो याति शुद्धये ॥
१०८४१३१ या लोकीं अत्यंत सहवास असला म्हणजे मनुष्यांना अनादर उत्पन्न होतो. गंगेच्या तीरीं राहणारा मनुष्य शुद्धतेसाठी गंगोदक सोडून दुसन्या तीर्थाच्या उदकाकडे जात असतो. १०७ संभावितस्य स्वजनात्पराभवो
यदा स सद्यो मरणाय कल्पते ॥ ४।३।२५ संभावित मनुष्याचा आप्तजनांकडून अपमान झाला म्हणजे त्याचवेळी त्याला तो अपमान मरणासारखा वाटतो. (अपमानापेक्षा मरण बरे, असे त्याला होते.) १०८ सर्वार्थसंभवो देहो जनितः पोषितो यतः।
न तयोर्याति निर्वेशं पित्रोर्मर्त्यः शतायुषा ॥१०॥४५।५ सर्व पुरुषार्थ संपादन करून देणारा देह ज्यांच्यापासून उत्पन्न झाला, व ज्यांनी त्याचे पोषण केले, त्या आईबापांचे ऋण फेडणे हे शंभर वर्षे जगूनही घडत नाही.
For Private And Personal Use Only