SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 411
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ४५८ सतां साप्तपदं मैत्रम् ॥ ७॥२१६।४ . सज्जनांच्या मागून सात पावलं चालल्याने त्यांच्याशी सख्य होते. ४५९ सतो हि मार्जनक्लेशो नासतस्तु कदाचन ॥ ३॥६०२ जी सद्वस्तु आहे ती नाहीशी करणे शक्य नाही, परंतु जी असद्वस्तु आहे तिचा बाध करण्याला मुळीच क्लेश पडत नाहीत. ४६० सत्यं मनोरमाः कामाः सत्यं रम्या विभूतयः। किंतु मत्ताङ्गनापाङ्गभङ्गलोलं हि जीवितम्॥७९३।७९ विषय आणि ऐश्वर्य ही रमणीय आहेत, असें धरून चाललों, तथापि जीवित हेच मुळी मत्त स्त्रियांच्या कटाक्षा इतकें चंचल आहे याला काय करणार? ४६१ सत्यां प्रज्ञामहानावि विवेके सति नाविके। संसारसागरादस्माद्यो न तीर्णो धिगस्तु तम् ॥५/७६।१३ बुद्धिरूपी मोठी नौका व विवेकरूपी नावाडी असतां, या संसारसागराच्या पैल तीराला जो जात नाही, त्याला धिक्कार असो. ४६२ सन्तोऽतीतं न शोचन्ति भविष्यच्चिन्तयन्ति नो। वर्तमानं च गृह्णन्ति कर्म प्राप्तमखण्डितम् ।। ६।१२४।१३ सज्जन भूतकालाच्या गोष्टीविषयीं शोक करीत बसत नाहीत व पुढील कार्याबद्दलही चिंता करीत नाहीत, तर वर्तमानकाळी प्राप्त झालेले कर्म मात्र सतत करीत राहतात. ४६३ संतोषः परमो लाभः सत्सङ्गः परमा गतिः।। विचारः परमं ज्ञानं शमो हि परमं सुखम् ॥२।१६।१९ संतोष हा अत्यंत श्रेष्ठ लाभ, सत्संग ही परमगति, विचार हैं परमज्ञान, आणि शम हेच परम सुख होय. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy