SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 412
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ४६४ संतोषः साधुसङ्गश्च विचारोऽथ शमस्तथा । ___एत एव भवाम्भोधावुपायास्तरणे नृणाम् ॥२।१६।१८ संतोष, सत्संग, विचार आणि शांति हीच काय ती मनुष्यांना संसाररूपी सागरांतून तारून नेणारी मुख्य साधने आहेत. ४६५ संतोषो हि परं श्रेयः संतोषः सुखमुच्यते ॥ २।१५।१ संतोष हाच मोक्ष, व संतोष हेच आत्यंतिक सुख होय. ४६६ समया स्वच्छया बुद्धया सततं निर्विकारया । __ यथा यत्क्रियते राम तददोषाय सर्वदा ॥ ७१९९/७ सम, निर्मल व निर्विकार बुद्धीनें जें जें करावें तें तें नेहमी निर्दोषच असते. ४६७ समुद्रस्येव गाम्भीर्य धैर्य मेरोरिव स्थितम् । अन्तःशीतलता चेन्दोरिवोदेति विचारिणः॥२।१८।१८ समुद्राचे गांभीर्य, मेरूचे धैर्य व चंद्राची शीतलता ही विचारी मनुष्याच्या अंतःकरणाला प्राप्त होतात. ४६८ संपदः प्रमदाश्चैव तरङ्गोत्तुङ्गभङ्गुराः । कस्तास्वहिफणच्छत्रच्छायासु रमते बुधः ॥ ७४४७१४९ संपदा आणि प्रमदा म्हणजे तरुण व सुंदर स्त्रिया या पाण्यावरील मोठ्या तरंगाप्रमाणे क्षणभंगुर आहेत. सर्पाच्या फणांच्या छायेप्रमाणे असलेल्या संपदा आणि प्रमदा यांच्या ठिकाणी कोणता शाहाणा मनुष्य रममाण होईल ? ४६९ संभवत्यङ्ग जगति न बीजेन विनाकुराः ॥ ६।९४१६२ (कुंभमुनि शिखिध्वज राजाला म्हणतात ) या जगांत बीजावांचून अंकुर संभवत नाही. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy