________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४५१ संसारस्यास्य दुःखस्य सर्वोपद्रवदायिनः।
उपाय एक एवास्ति मनसः स्वस्य निग्रहः ॥४।३५/२ सर्व प्रकारे उपद्रव होणान्या अशा या संसारदुःखाचा नाश होण्याला स्वतःच्या मनाचा निग्रह हाच काय तो एक उपाय आहे. ४५२ संसारात्तरणे जन्तोरुपायो ज्ञानमेव हि ॥२।१०।२२
संसारांतून तरून जाण्याला ज्ञान हाच काय तो एक उपाय आहे. ४५३ संसाराम्बुनिधावस्मिन्वासनाम्बुपरिप्लुते।।
ये प्रज्ञानावमारूढास्ते तीणा बुडिताः परे ॥४।४६।२२ वासनारूपी पाण्याने ओतप्रोत भरलेल्या या संसारसमुद्रांत जे बुद्धिरूपी नावेचा आश्रय करतात, तेच या समुद्राच्या पलीकडे तरून जातात, इतर बुडून जातात. . ४५४ संकटे विस्मरत्येव जनो गौरवसत्क्रियाम् ।।३।७४।२५
कोणीही झाला तरी संकटाचे वेळी आदर सत्कार करणे विसरून जातोच. ४५५ संकल्पः परमो बन्धस्त्वसंकल्पो विमुक्तता॥३॥११४।२४
संकल्प हाच मोठा बंध असून असंकल्प हाच खरा माक्ष आहे. ४५६ सज्जनाशयनीकाशं त्यक्त्वा बही महत्सरः ।
पिबत्यम्ब्वभ्रनिष्ठयतं मन्ये तन्नतिभीतितः ७११८४२० (सहचर राजाला म्हणतो) सज्जनांच्या अंतःकरणाप्रमाणे स्वच्छ असलेले मोठे सरोवर सोडून, मोर मेघांतून गळलेले पाणी पितो, याचे कारण आपले मस्तक वाकवावे लागेल, हेच असावे असे वाटते. ४५७ सजनो हि समुत्तार्य विपद्भयो निकटस्थितम् ।
नियोजयति संपत्सु स्वालोकष्विव भास्करः ॥७४७।३० सूर्य स्वतःच्या प्रकाशाने इतरांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे सज्जन आपल्याजवळ असलेला कोणी विपत्तीत पडल्यास त्याला विपत्तीपासून सोडवून चांगली स्थिति प्राप्त करून देतात.
For Private And Personal Use Only