________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२१४ दैवमेवेह चेत्कर्तृ पुंसः किमिव चेष्टया ।
स्नानदानासनोच्चारान्दैवमेव करिष्यति ।। २।८६ सर्व गोष्टी जर देवानेच होत असतील, तर मनुष्याला काही हालचाल तरी करून काय करावयाचे आहे ? तसे असेल तर स्नानदानादि क्रियाही दैवच करूं शकेल. २१५ दैवात्तमिति मन्यन्ते ये हतास्ते कुबुद्धयः ॥ २।५।२९
कोणतीही गोष्ट दैवाने घडून येते, अशी ज्यांची भावना असते, ते मनुष्य दुष्टबुद्धीचे असून त्यांचा अखेरीस नाश होतो. २१६ दोषान्प्रसवति स्फारान्वासनावलिता मतिः।
कीर्णकण्टकबीजा भूः कण्टकप्रसरं यथा ॥४॥३५।६ कांटेरी झाडे तोडून टाकली, पण त्या झाडांची मुळे भूमीत तशीच कायम असली, तर त्यांची पुन्हां जोराने वाढ होऊन सर्व भूमि कांट्यांनी भरून जाते, त्याचप्रमाणे विषयांचा त्याग केला, तरी जोपर्यंत अंतःकरणांत वासनाबीज शिल्लक आहे, तोपर्यंत तें विषयांचे स्मरण करवून रागद्वेषादि दोष उत्पन्न केल्याशिवाय राहणार नाही. २१७ द्विविधो भवति प्रष्टा तत्त्वज्ञोऽज्ञोऽथवापि च ।
अज्ञस्याज्ञतया देयो ज्ञस्य तु ज्ञतयोत्तरः॥ ७।२९।३२ तत्त्वज्ञ आणि अज्ञ असे दोन प्रकारचे प्रश्न करणारे असतात, तत्त्वज्ञाला तात्त्विक उत्तर दिले पाहिजे आणि अज्ञ मनुष्याला त्याच्या सारखें सांगून शांत केले पाहिजे. २१८ द्वौ हुडाविव युध्येते पुरुषार्थों समासमौ ।
प्राक्तनश्चैहिकश्चैव शाम्यत्यत्राल्पवीर्यवान् ॥ २।५।५ दोन एडके आपसांत लढू लागले म्हणजे त्यांची कधी बरोबरी होते किंवा एक अधिक बलिष्ठ असल्यास तो दुसऱ्याला जिंकतो, त्याचप्रमाणे पूर्वीचा व हल्लीचा प्रयत्न हे एकमेकांशी लढत असतात. त्यामध्ये कमी सामर्थ्याचा असेल त्याला हार खावी लागते.
For Private And Personal Use Only