________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२०९ दृष्टान्तेन विना राम नापूर्वार्थोऽवबुध्यते ।
यथा दीपं विना रात्रौ भाण्डोपस्करणं गृहे ॥२।१८।५१ ( श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे रामा, ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशाशिवाय घरांतील भांडी वगैरे वस्तू दिसत नाहीत, त्याप्रमाणे दृष्टांताशिवाय अदृष्ट अर्थाचा बोध होत नाही. २१० देहपादपसंस्थस्य हृदयालयगामिनः ।
तृष्णा चित्तखगस्पेयं वागुरा परिकत्पिता॥४।२७३३ देहरूपी वृक्षावरील हृदयरूपी घरट्याकडे जाणान्या चित्तरूपी पक्ष्याला पकडण्याकरितांच हे तृष्णारूपी जाळे जणूंकाय निर्माण करण्यांत आले आहे. २११ देहोऽहमिति या बुद्धिः सा संसारनिबन्धनी ।
न कदाचिदियं बुद्धिरादेया हि मुमुक्षभिः ।।६।११८१८ 'मी देह आहे,' अशी जी बुद्धि ती संसारांत जखडून टाकणारी आहे. यासाठी मुमुक्षूनी त्या बुद्धीचा स्वीकार केव्हाही करू नये. २१२ दैन्यदारिद्यदुःखार्ता अप्यन्ये पुरुषोत्तमाः।
पौरुषेणैव यत्नेन याता देवेन्द्रतुल्यताम् ॥ २।५।२७ दैन्य, दारिद्य आणि दुःख यांनी युक्त असलेले उत्तम पुरुष पूर्वी पुरुषप्रयत्नानेंच इंद्रपदाला पोंचले आहेत. २१३ दैवं संप्रेरयति मामिति दग्धधियां मुखम् ।
अदृष्टश्रेष्ठदृष्टीनां दृष्ट्वा लक्ष्मीनिवर्तते ॥ २।५।२० 'मला दैव प्रेरणा करीत आहे ' असें म्हणणाऱ्या लोकांची बुद्धि होरपळून गेली आहे, असे समजावें. ज्यांच्या दृष्टीला दैवच श्रेष्ठ आहे असे वाटते, अशा लोकांचे तोंड दिसल्याबरोबर लक्ष्मी त्यांच्याकडे पाठ फिरविते.
For Private And Personal Use Only