________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२१९ धीमन्तो न निषेवन्ते पर्यन्ते दुःखदां क्रियाम्॥५॥५२॥४
ज्या कृत्याचा परिणाम दुःखदायक होणार, असे कृत्य करण्याला विचारी लोक केव्हांच तयार होत नाहीत. २२० धीरोऽप्यतिबहुज्ञोऽपि कुलजोऽपि महानपि ।
तृष्णया बध्यते जन्तुः सिंहः शृङ्खलया यथा॥४॥२७॥३२ ज्याप्रमाणे सिंह श्रृंखलेने बद्ध होतो त्याप्रमाणे मनुष्य कितीही धैर्यवान, ज्ञानी आणि कुलीन असला, तरी तृष्णेच्या जाळ्यांत सांपडून बद्ध होतो. २२१ धीः सम्यग्योजिता पारमसम्यग्योजिताऽऽपदम् ।
नरं नयति संसारे भ्रमन्ती नौरिवार्णवे ॥ ५॥१२॥३६ बुद्धि चांगल्या रीतीने योजिली तर मनुष्य संकटांतून पार पडतो, अयोग्य रीतीने तिचा उपयोग केल्यास आपत्ति प्राप्त होते. ज्याप्रमाणे अशिक्षित नावाड्याची नौका समुद्रामध्ये गिरक्या खाते, त्याप्रमाणे मंदबुद्धि पुरुष या संसारसागरांत गटंगळ्या खात राहतो. २२२ न कदाचन जायन्ते शीतांशोरुष्णरश्मयः ॥ १।९।३
चंद्राचे किरण कधीही उष्ण होत नाहीत. २२३ न कारणं विना कार्य भवतीत्युपपद्यते ॥ ७१७९।८
कारण असल्यावांचून कार्य होणे संभवत नाही. २२४ न कालमतिवर्तन्ते महान्तः स्वेषु कर्मसु ॥ ५।१०।९
महात्मे आपल्या कर्तव्यकाविषयी केव्हाही कालातिकम होऊ देत नाहीत. ( वेळच्यावेळी काम करतात.) २२५ न किंचन फलं धत्ते स्वाभ्यासेन विना क्रिया॥२।१८।११ अभ्यास केल्याशिवाय कोणतेच कृत्य फलद्रूप होत नाही.
For Private And Personal Use Only