________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३.०
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१४३ चित्तमिन्द्रियसेनाया नायकं तज्जयाजयः । उपानद्गूढपादस्य ननु चर्मावृतैव भूः ॥ ७/१६३/६ इंद्रियरूपी सेनेचा अधिपति चित्त आहे. या चित्ताला जिंकलें असतां इंद्रिये जिंकलीं जातात. पायांत जोडे घातलेल्या मनुष्याला सर्व पृथ्वी चामड्यानें आच्छादिल्यासारखीच आहे. ( जोडे घालून पाय झांकले म्हणजे पृथ्वीवरील सर्व कांट्यांचें निवारण झालेच, त्याप्रमाणें एका चित्ताला जिंकल्यानें सर्व इंद्रियांना जिंकल्यासारखेंच होतें. ) १४४ चित्रसंग युद्धस्य सैन्यस्याक्षुब्धता यथा ।
तथैव समता ज्ञस्य व्यवहारवतोऽपि च || ७|३०|५ चित्रांतील समरांगणांत युद्ध करीत असलेलें सैन्य निश्चेष्ट असतें, त्याप्रमाणें ज्ञानी पुरुष व्यवहार करीत असतांही आंतून निश्चल असतो.
१४५ चित्रामृतं नामृतमेव विद्धि चित्रानलं नानलमेव विद्धि ।
चित्राङ्गना नूनमनङ्गनेति
वाचा विवेकस्त्वविवेक एव || ४|१८/६९
( श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) चित्रांतील अमृत खरें अमृत नव्हे, चित्रांतील अग्नि हा खरा अग्नि नव्हे, आणि चित्रांतील स्त्री ही खरी स्त्री नव्हे, त्याप्रमाणें केवळ बोलण्यांतील विवेक म्हणजे खरा विवेक नव्हे, तर तो अविवेकच होय. १४६ चिन्तनेनैधते चिन्ता विन्धनेनेव पावकः ।
नश्यत्यचिन्तनेनैव विनेन्धनमिवानलः || ५ | २१६
ज्याप्रमाणे अग्नीमध्ये इंधन टाकीत गेल्यास तो एकसारखा वाढत जातो, त्याप्रमाणे विषयांचं चिंतन करीत गेल्यानें चिंता वाढू लागते; परंतु इंधने टाकण्याचे बंद केल्यास अग्नि आपोआप विझून जातो, त्याप्रमाणे विषयांचे चिंतन थांबविलें म्हणजे चिंतेचाही नाश होतो.
For Private And Personal Use Only