________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२९
१३८ गुणैः कतिपयैरेव बहुदोषोऽपि कस्यचित् ।
उपादेयो भवत्येव शौर्यसंतोषभक्तिभिः॥७११६।५५ पुष्कळ दोष असलेल्या मनुष्यालाही त्याच्या आंगच्या शौर्यादि काही थोड्याशा गुणांमुळे काही लोक पदरी बाळगतात. १३९ गुरुश्चेदुद्धरत्यज्ञमात्मीयात्पौरुषादृते ।
उष्ट्रं दान्तं बलीवदं तत्कस्मानोद्धरत्यसौ ॥५॥४३।२६ शिष्याने स्वतः प्रयत्न केला नसतांही जर गुरु त्याचा अज्ञानांतून उद्धार करू शकतात, तर वठणीस आणलेल्या उंट, बैल इत्यादि जनावरांनासुद्धा त्या गुरूने आत्मज्ञानी केले असते. १४० गेहमेवोपशान्तस्य विजनं दूरकाननम् ।
अशान्तस्याप्यरण्यानी विजना सजना पुरी ॥७३॥३८ शांत पुरुषाला त्याचे घरच निर्जन अरण्य आहे. पण शांत नसलेल्या पुरुषाला निर्जन अरण्यही लोकांनी गजबजून गेलेले नगर आहे. १४१ गोरर्थे ब्राह्मणस्यार्थे मित्रस्यार्थे च सन्मते ।
शरणागतयत्नेन स मृतः स्वर्गभूषणम् ॥ ३॥३१॥२८ (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) गाई, ब्राह्मण, मित्र आणि शरण आलेला यांच्या रक्षणासाठी लढत असतां, जो वीरपुरुष आपला देह धारातीर्थी अर्पण करतो, तो स्वर्गलोकाला खरोखर अलंकृतच करतो. १४२ चन्द्रांशव इवोत्सार्य तमांस्यमृतनिर्मलाः ।
अन्तः शीतलयन्त्येता महताममला गिरः॥ ५।४।४ महात्म्यांची वाणी चंद्रकिरणासारखी निर्मल, शीतल आणि अमृतमय असून मोहांधकार नष्ट करणारी व अंतःकरणाला सुख देणारी असते.
For Private And Personal Use Only