________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१४७ चिन्तामणिरियं प्रज्ञा हृत्कोशस्था विवेकिनः।
फलं कल्पलतेवैषा चिन्तितं संप्रयच्छति ॥५॥१२॥३४ विचारी पुरुषांच्या हृदयकोशांत असलेली बुद्धि हा चिन्तामणिच आहे. अथवा चिंतिलेलें फल देणारी ती एक कल्पलताच आहे. १४८ जगदृश्यं तु यद्यस्ति न शाम्यत्येव कस्यचित् ।
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ॥३।१२६ दृश्यजग जर खरोखरच असेल तर त्याचा कोणाच्याही ठिकाणी बाध होणे शक्य नाही. कारण जें नाहीं तें आहेसे होत नाही, व जें आहे तें नाहींसें होत नाही. १४९ जडः क इव वा नाम गुणागुणमपेक्षते ॥ ३७०।६२
मूर्ख मनुष्याच्या ठिकाणी गुण आणि अवगुण यांचे तारतम्य बेताचेच असते. १५० जडत्वान्निःस्वरूपत्वात्सर्वदैव मृतं मनः ।
मृतेन मार्यते लोकश्चित्रेयं मौयंचक्रिका ॥५।१३।१०० मन हे जड आणि निःस्वरूप असल्यामुळे सर्वदा मेलेलेच आहे परंतु या मृत मनाकडून अनेक लोक मारले जातात, ही मूर्खपरंपरा विचित्रच म्हणावयाची. १५१ जडेन मुकेनान्धेन निहतो मनसापि यः। ___ मन्ये स दह्यते मूढः पूर्णचन्द्रमरीचिभिः॥ ५।१३।१०३
जड, मूढ आणि अंध अशा मनाकडून जो मारला जातो, असा मूढ पुरुष पूर्ण चंद्राच्या शीतळ किरणांनी सुद्धां जाळला जाण्याला काय हरकत आहे ? १५२ जडो देहो मनश्चात्र न जडं नाजडं विदुः।।३।११०११३
देह हा केवळ जड आहे, परंतु मन हे धड जडही नाही, आणि चेतनही नाही.
For Private And Personal Use Only