________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२९ अन्तःशीतलता या स्यात्तदनन्ततपःफलम् ॥ ५/५६।९
अन्तःकरण शांत असणे, हे अनंत तपांचे फल होय. ३० अन्तस्तृष्णोपतप्तानां दावदाहमयं जगत् ।
भवत्यखिलजन्तूनां यदन्तस्तद्वहिःस्थितम् ॥ ५५६॥३४ तृष्णेमुळे अन्तःकरण संतप्त झालेल्या लोकांना हे जग वणवा लागल्यासारखे दिसते. कारण, जे मनुष्याच्या मनांत असते, तेंच त्याच्या दृष्टीला बाह्य जगांत दिसते. ३१ अन्तःसंसक्तिरेवैकं कारणं बन्धमोक्षयोः॥५६७३४
अन्तःकरणाची आसक्ति असणे व नसणे हेच बंध आणि मोक्ष यांचे मुख्य कारण होय. ३२ अन्तःसंत्यक्तसर्वाशो वीतरागो विवासनः।
बहिःसर्वसमाचारो लोके विहर राघव ॥ ५॥१८॥१८ (श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे राघवा, अन्तःकरणांतील सर्व आशा, विषयप्रेम व वासना यांना पार झुगारून दे, आणि बाह्यतः सर्व लोकव्यवहार करीत जा. ३३ अन्तःसारतया कार्य लघवोऽप्याप्नुवन्ति हि॥३७२।१९
एखादा क्षुद्र मनुष्यदेखील आपले कार्य अन्तःकरणाच्या दृढनिश्चयाच्या सामर्थ्यामुळे पार पाडतो. ३४ अन्नभूता हि महतां लघवो यत्नशालिनाम् । ___ यथेष्टं विनियोज्यन्ते तेन कर्मसु लोष्टवत् ॥ २।६।१३
दैववादी दुबळे लोक उद्योगी बलिष्ठ लोकांच्या भक्ष्यस्थानी पडतात. मातीच्या ढेकळांना तुडवून वाटेल तसा आकार देतां येतो, त्याप्रमाणे प्रयत्न करणारे लोक आपल्या कार्यामध्ये दुबळ्या आळशी लोकांचा वाटेल तसा उपयोग करून घेतात.
For Private And Personal Use Only