________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्री योगवासिष्ठ सुभाषितानि
३५ अपरीक्ष्य च यः शिष्यं प्रशास्त्यतिविमूढधीः ।
स एव नरकं याति यावदाभूतसंप्लवम् || ४ | ३९।२६ शिष्याची परीक्षा न करतां आणि त्याची योग्यता न जाणतां जो गुरु त्याला ज्ञानोपदेश करितो, तो चिरकाल नरकवासाचें दुःख भोगितो.
३६ अपश्यन्काष्ठरन्ध्रस्थवृषणाक्रमणं यथा
कीलोत्पाटी कपिर्दुःखमेतीदं हि तथा मनः || ३|९९।४१ लाकडामध्यें ठोकलेली पाचर उपटणाऱ्या एखाद्या अविचारी वानराचा वृषण फटीमध्यें सांपडून तो मूर्ख वानर जसा संकटांत सांपडतो, त्याप्रमाणें नेहमीं कांहींना कांहीं उलाढाली करण्यांत दंग झालेलें चंचल मन दुःख भोगतें. ३७ अपि कष्टतरां प्राप्तैर्दशां विवशतां गतैः ।
मनागपि न संत्याज्या मानवैः साधुसंगतिः ॥ २।१६।८ कसल्याही प्रकारची कष्टदशा प्राप्त होऊन मनुष्य विव्हल झाला, तरी त्यानें सत्संगाचा त्याग क्षणभरहि करूं नये. ३८ अपि जीवितदानेन गुणिनं परिपालयेत् ।
गुणवत्संगमपध्या मृत्युरप्येति मित्रताम् || ३ | ७७ २८ गुणिजनांच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष जीवितावर पाणी सोडण्याचा प्रसग आला तरी, त्याला माघार घेतां कामा नये, कारण गुणिजनांच्या समागमरूपी औषधीमुळे प्रत्यक्ष मृत्युसुद्धां मित्र बनत असतो. ३९ अपि पौरुषमादेयं शास्त्रं चेद्युक्तिबोधकम् ।
अन्यत्त्वार्षमपि त्याज्यं भाव्यं न्याय्यैकसेविना ।।२।१८।२
युक्तिबोध करणारें शास्त्र एखाद्या सामान्य पुरुषानें केलेलें असले तरी तें ग्राह्य आहे. परंतु एखाद्या प्राचीन ऋषीनें केलेलेंहि शास्त्र युक्तिशून्य असले, तर न्यायी मनुष्याने त्याचा त्याग करणेंच उचित आहे.
For Private And Personal Use Only